31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवारांकडून देवेंद्र फडणवीसांना मिळणार ‘और एक धक्का’

शरद पवारांकडून देवेंद्र फडणवीसांना मिळणार ‘और एक धक्का’

टीम लय भारी

मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेले अनेक निर्णय नव्या सरकारने रद्दबातल केले आहेत. आता फडणवीस सरकारचा आणखी एक महत्वाचा निर्णय रद्द करण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत.

फडणवीस सरकारने ‘बीफ’वर अनेक निर्बंध लादणारे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे शेतकरी, बीफचा व्यवसाय करणारा मुस्लीम समाज व वाहतुकदारांचे मोठे नुकसान होत आहे. फडणवीस यांचा हा निर्णय रद्द करण्यासाठी कायद्यात दुरूस्ती करावी लागणार आहे.

शरद पवारांकडून देवेंद्र फडणवीसांना मिळणार ‘और एक धक्का’

राज्यात ‘पशु संरक्षण कायदा १९७६’ आस्तित्वात आहे. त्यामध्ये फडणवीस सरकारच्या काळात बदल करण्यात आला. कोणत्याही जनावरांचा मांसाहरासाठी वापर करता येणार नाही असा बदल करण्यात आला. त्यामुळे बाकड जनावरेसुद्धा शेतकऱ्यांना पोसावी लागत आहेत. जनावरांच्या मांसाहाराचा व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. जनावरांची विक्री करता येत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरवर्षी १० हजार कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. आतापर्यंत ५० हजार कोटीचे नुकसान झाले आहे. वाहतूकदारांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे कायद्यात पूर्ववत बदल करण्याच्या मागणीसाठी शेतकरी व मुस्लीम व्यवसायिकांनी पवार यांची नुकतीच भेट वेगवेगळी भेट घेतली. शेतकरी व मुस्लीम व्यवसायिकांची ही मागणी योग्य असल्याचे पवार यांनी यावेळी मत व्यक्त केले. एवढेच नाही तर, कायद्यात सकारात्मक बदल करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पशु संवर्धन व दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांच्यासोबत चर्चा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

जी जनावरे शेतकऱ्यांच्या उपयोगाची नाहीत. मग ती गाय, म्हैस अथवा बैल असेल. अशा जनावरांचा मांसाहरासाठी वापर करायला काहीही हरकत नाही, असे खुद्द विनायक सावरकर यांनी एका पुस्तकात लिहिले आहे. या पुस्तकाचा संदर्भ मी राज्यसभेतील चर्चेत दिला होता असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

ताज्या अपडेट मिळविण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

शरद पवारांसोबत बैठक घडवून आणण्यासाठी ईश्वरलाल जैन, अबुबकर खान, हाफीज हुस्समुद्दीन यांनी पुढाकार घेतला. मोहम्मद कुरेशी, आसीफ कुरेशी, आसीफ सिद्दीकी, शरीफ कुरेशी, उमर अन्सारी, ताज कुरेशी, नदीम अन्सारी, सोहेल शेख, सादीक शेख, इब्राहिम खान, शकील शेख, शाहिद शेख, भोला भाई आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.

विशेष म्हणजे, आदल्या दिवशीच शेतकऱ्यांचे नेते रघुनाथदादा पाटील, शंकर मोहिते, सतीश देशमुख, गणेश घुगे यांनी सुद्धा शरद पवार यांची भेट घेऊन हीच मागणी केली होती.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरे, अजितदादांचा देवेंद्र फडणवीसांना झटका; महत्वाचा ‘जीआर’ केला जारी

देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर तुकाराम मुंढे, एकूण २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

Super EXCLUSIVE : मंत्र्यांची कार्यालये, बंगल्यांवर करोडोंची उधळपट्टी; देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासाठीही कोटीचा चुराडा

मला देवेंद्र फडणवीस आणि चौकडीने छळले : एकनाथ खडसे

देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये विरोधकांचे फोन टॅप; ठाकरे सरकारकडून चौकशीचे आदेश

मला देवेंद्र फडणवीस आणि चौकडीने छळले : एकनाथ खडसे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी