32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यNumbness Home Remedies : हात पाय सतत सुन्न पडतायत? मग, ‘या’ घरगुती...

Numbness Home Remedies : हात पाय सतत सुन्न पडतायत? मग, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा आराम

टीम लय भारी

मुंबई : अनेकवेळा असे घडते की सतत एकाच आसनात बराच वेळ बसल्याने आपले हात पाय सुन्न होतात. असे का घडते, असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? शरीराच्या काही भागांचा बधीरपणा सामान्य असला तरी, शरीरातील कोणत्याही कमतरतेमुळे किंवा आजारामुळे देखील हे होऊ शकतो(Home remedies for numbness)

अनेकदा असं होतं की, आपण त्याच स्थितीत बसून राहतो, त्यामुळे अवयव सुन्न होण्याची स्थिती येते. अशा परिस्थितीत, आपण सुन्न झालेल्या भागाला धक्का देतो किंवा चिमटा काढतो, जेणेकरून तो त्याच्या सामान्य स्थितीत परत येईल.

थंडीत कोरड्या केसांनी हैराण ? मग करा हे उपाय

शरीरातील व्हिटामिन सी कमी होण्याची ‘ही’ महत्त्वाची लक्षणे जाणून घ्या

अनेक वेळा ही बधीरता राहिल्याने हात-पायांमध्ये विचित्र मुंग्या येतात. अशा स्थितीत आपले हातपाय बधीर का होतात हे जाणून घेऊया (Numbness Home Remedies) आणि त्यापासून त्वरित आराम कसा मिळवता येईल, हे जाणून घेऊया…

शरीराचे अवयव सुन्न का होतात?  जाणून घ्या कारणे

अनेकदा आपले हात, खांदे आणि पाय सुन्न होतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे झोपताना, उभे राहताना आणि बसताना या अवयवांवर सर्वाधिक ताण येतो. त्याच स्थितीत बसल्याने शरीरातील स्नायू आणि रक्तवाहिन्या शिथिल होतात आणि अंग सुन्न होण्याच्या अवस्थेत जाते. सामान्यतः जेव्हा शरीरातील रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होतो, तेव्हा शरीराचे अवयव सुन्न होतो.

सुन्नपणाची लक्षणे काय आहेत

शरीराचा जो भाग बधीर होतो, तिथे मुंग्या येतात. त्यावेळी त्या भागात एक विचित्र भावना येते. तो अवयवही काम करणे बंद करतो. यामुळे अनेक वेळा या अवयवाला मानसिक संकेतही मिळत नाहीत. अशा परिस्थितीत तो अवयव सामान्य करण्यासाठी एक धक्का द्यावा लागतो.

सीताफळ खाण्याचे फायदे आणि तोटे माहित आहे का?

Migraine Remedy: This Common Kitchen Ingredient Might Help, Shares Mira Rajput

घरगुती उपाय 

लसूण किंवा कोरडे आले : जर तुम्हाला नेहमी एखादा अवयव सुन्न वाटत असेल, तर सकाळी उठल्यानंतर सुक्या आल्याचे अर्थात सुंठाचे छोटे तुकडे किंवा लसणाच्या 2 पाकळ्या चावून खाव्यात. याच्या मदतीने तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. खरं तर लसूण आणि सुंठ खाल्ल्याने शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते.

पिंपळाची पाने 

पिंपळाच्या झाडाच्या पानात अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे असतात. जर तुम्हाला सुन्नपणा वाटत असेल तर 3-4 ताजी पाने मोहरीच्या तेलात चांगल्या प्रकारे शिजवून घ्या आणि नंतर या तेलाने सुन्न पडलेल्या भागाला मालिश करा. असे केल्याने तुम्हाला या समस्येतून आराम मिळेल.

शुद्ध तूप 

जर, तुम्हाला दररोज पाय सुन्न होण्याच्या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर घाबरू नका. यासाठी चिमूटभर शुद्ध तुपाच्या वापराने या समस्येपासून आराम मिळू शकतो. बधीरपणापासून आराम मिळण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी शुद्ध देशी तूप थोडे कोमट करून तळव्यांना लावावे. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

(सूचना : कोणत्याही उपायापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य आहे.)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी