34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजIAS अभिमन्यू काळे यांची धडक कारवाई, ‘मास्क,’ औषधांचा काळाबाजार करणाऱ्या 171 जणांवर...

IAS अभिमन्यू काळे यांची धडक कारवाई, ‘मास्क,’ औषधांचा काळाबाजार करणाऱ्या 171 जणांवर कारवाईचा दंडूका

टीम लय भारी

मुंबई : ‘मास्क’च्या किंमती निश्चित करणारा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. पण अनेक औषध विक्रेत्यांनी हा आदेश धाब्यावर बसविला आहे. अशा तब्बल 171 दुकानदारांवर अन्न व औषध प्रशासन विभागाचे ( एफडीए ) आयुक्त IAS अभिमन्यू काळे यांनी कारवाईचा दंडूका उगारला आहे ( IAS Abhimanyu Kale proposed action against 171 defaulters ).

या औषध विक्री दुकानदारांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांचे परवाने रद्द करण्याबाबतही एफडीएने कारवाई प्रस्तावित केली आहे. विशेष म्हणजे, एफडीएच्या अधिकाऱ्यांनी अवघ्या एका महिन्यांतच तब्बल 4 हजार विक्रेत्यांच्या तपासणी केल्या आहेत ( FDA issued show cause notices to 171 shop keepers ).

राज्यभरात ही धडक मोहीम सुरू आहे. गेल्या महिन्यांतच IAS अभिमन्यू काळे यांनी एफडीएच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी, म्हणजे 22 ऑक्टोबर रोजी त्यांनी एक आदेश जारी केला. एफडीएचे सह आयुक्त व उपायुक्त यांना दररोजचे टार्गेट देवून दुकानांच्या तपासणी करण्यास सांगण्यात आले.

हे सुद्धा वाचा

VIDEO : भीक मागणाऱ्या चिमुरड्यालाही समजतंय ‘मास्क’चे महत्व

No Mask No Entry : मास्क नसल्यास बेस्ट बस, टॅक्सी, रिक्षामध्ये प्रवेश नाही

WHO : मास्क कुणी आणि केव्हा वापरावा!

या आदेशानुसार राज्यभरात 3938 औषध विक्रेत्यांच्या तपासणी करण्यात आल्या आहेत. त्यात 167 विक्रेत्यांनी ‘मास्क’ची विक्री चढ्या दराने केल्याचे आढळून आले आहे. औषधांचे इतर गैरप्रकार केलेल्यांची संख्या 172 आहे. यापैकी गंभीर गैरप्रकार केलेल्या 171 जणांवर एफडीएने कारवाई प्रस्तावित केली आहे.

सरकारने ठरवून दिलेल्या दरानेच ‘मास्क’ची विक्री बंधनकारक

आरोग्य मंत्री राजेश टोपे, तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी ‘मास्क’चे दर नियंत्रित करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यासाठी त्यांनी एक समिती नेमली होती. या समितीने मास्कच्या किंमती 10 ते 40 रूपये इतक्या अवाक्यात आणल्या आहेत. पण तरीही औषध विक्री करणारे दुकानदार 100 रुपयांपेक्षा जास्त दराने मास्क विकत आहेत.

सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करून जे दुकानदार ‘मास्क’ची चढ्या दराने विक्री करीत आहेत, त्यांच्यावर सक्त कारवाई आम्ही करीत आहोत. अशा कारवाया आणखी मोठ्या प्रमाणात करणार आहोत, अशी माहिती IAS अभिमन्यू काळे यांनी ‘लय भारी’ला दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी