30 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमंत्रालयBreaking : माजी IAS नीला सत्यनारायण यांचे ‘कोरोना’मुळे निधन

Breaking : माजी IAS नीला सत्यनारायण यांचे ‘कोरोना’मुळे निधन

टीम लय भारी

मुंबई : राज्यातील धडाडीच्या माजी IAS अधिकारी नीला सत्यनारायण यांचे आज दुर्दैवी निधन झाले आहे ( Neela Satyanarayan no more ). त्यांच्या निधनामुळे राज्यातील प्रशासकीय व राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सेव्हन हिल्स रूग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. पण त्यांची प्रकृती खालावत गेल्यामुळे अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

Breaking : माजी IAS नीला सत्यनारायण यांचे ‘कोरोना’मुळे निधन
जाहिरात

नीला सत्यनारायण यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम केले होते. राज्याच्या विविध विभागात त्या प्रधान सचिव म्हणूनही कार्यरत होत्या. गृह विभागाच्या प्रधान सचिव म्हणूनही त्यांनी काम केले होते.

त्या उत्तम लेखिका होत्या. अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांनी स्तंभलेखन केले होते. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्या १९७२ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी