34 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमंत्रालयआणखी एका मंत्र्यांना ‘कोरोना’ची लागण

आणखी एका मंत्र्यांना ‘कोरोना’ची लागण

टीम लय भारी

मुंबई : ‘महाविकास आघाडी’ सरकारमधील वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे ( Aslam Shaikh tested corona positive ). त्यामुळे ‘कोरोना’ची लागण झालेले शेख हे चौथे मंत्री ठरले आहेत.

यापूर्वी जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण व धनंजय मुंडे या तीन मंत्र्यांना ‘कोरोना’ची लागण झाली होती. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्नीलाही ‘कोरोना’ची लागण झाली आहे. गडाख यांनीही स्वतःला ‘कॉरन्टाईन’ करून घेतले आहे ( Aslam Shaikh is fourth minister, who has tested corona positive).

हे सुद्धा वाचा

Breaking : माजी IAS नीला सत्यनारायण यांचे ‘कोरोना’मुळे निधन

राज ठाकरेंच्या कृष्णकुंजवर कोरोनाचा प्रवेश

वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी ट्विटरद्वारे स्वतःला ‘कोरोना’ची लागण झाल्याची माहिती दिली आहे. शेख यांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत, परंतु चाचणीमध्ये त्यांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

‘मी स्वतःला कॉरन्टाईन करून घेतले आहे. माझ्या निकट संपर्कात आलेल्या सगळ्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी’ असे शेख यांनी म्हटले आहे. ‘कॉरन्टाईन’ असलो तरी घरूनच काम निरंतर सुरू ठेवणार असल्याचेही शेख यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. ( Corona Positive ministers in Mahavikas Aghadi government )

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी