34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeराजकीयशिवाजी पार्कवर लतादीदींचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं, काँग्रेसची मागणी

शिवाजी पार्कवर लतादीदींचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं, काँग्रेसची मागणी

टीम लय भारी

मुंबई:- गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. शिवाजी पार्कवर काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता भाजप पाठोपाठ काँग्रेसने देखील शिवाजी पार्कवर लतादीदींचे स्मारक करावे, अशी मागणी केली जात आहे.(international standard memorial of Latadidi at Shivaji Park, Congress demand)

 भारतरत्न लतादीदी यांचं स्मारक हे शिवाजी पार्कलाच व्हावं आणि चांगल्या दर्जाचं तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावं, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील केली आहे. काँग्रेसनं देखील लतादीदींचं स्मारक शिवाजी पार्क याठिकाणी केलं जावं अशी मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा

लतादीदींना श्रद्धांजली वाहताना संसदही झाले भावुक

गानसम्राज्ञी लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड

‘मी गांधींना का मारले’ या चित्रपटाचे प्रदर्शन राज्यात थांबवावे, काँग्रेसची मुख्यमंत्र्यांना मागणी

Maharashtra Floor Test Highlights: Uddhav Thackeray thanks ‘baap janata’ after winning trust vote

दरम्यान नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख हे सर्वजण कोरोना बाधित आहेत. त्यामुळे ते काल लता दिदींच्या अंत्यदर्शनाच्या  ठिकाणी हजर राहू शकले नाहीत.

नाना पटोले म्हणाले की,  लतादीदी या काँग्रेस परिवारातल्या होत्या.  काँग्रेसने भारतरत्न दिला म्हणून नाही पण त्यांचे योगदान एवढे मोठे आहे.  आता मी लतादिदींच्या परिवाराला सांत्वन करायला जातो आहे.

नाना पटोले म्हणाले की, लतादीदी यांचं स्मारक हे शिवाजी पार्कलाच व्हावं आणि चांगल्या दर्जाचं व्हावं, आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावं.  देशातून आणि जगातून येणाऱ्या लोकांना लतादीदींच्या स्मारकाला गेल्यानंतर लतादीदींचा गोड आवाज कालच्या, आजच्या आणि उद्याच्या पिढीला स्मरणात राहील. अशा दर्जाचे स्मारक शिवाजी पार्क मध्ये व्हावं हे काँग्रेसची भूमिका आहे, असं देखील नाना म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी