31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयलतादीदींना श्रद्धांजली वाहताना संसदही झाले भावुक

लतादीदींना श्रद्धांजली वाहताना संसदही झाले भावुक

टीम लय भारी

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात 31 जानेवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने झाली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर दोन्ही सभागृहात तब्बल १२ तास चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देणार आहेत.(Latadidi ,Parliament also became emotional)

भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचं कामकाज आज सुरू होताच राज्यसभेत लतादीदींना श्रद्धांजली वाहण्यात आली.

हे सुद्धा वाचा

गानसम्राज्ञी लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत काळाच्या पडद्याआड

Lata Mangeshkar : लता मंगेशकरांनी सांगितली रेडिओवरील पहिल्या गाण्याची आठवण !

Shah Rukh Khan Offering ‘Dua’ For Lata Mangeshkar Makes Twitter Emotional

भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सदस्यांनी एक मिनिट मौन पाळल्याने राज्यसभेचे कामकाज तासभरासाठी तहकूब करण्यात आले. राज्यसभेतील सर्व सदस्यांनी १ मिनिट उभं राहून मौन राखत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली. यानंतर राज्यसभेचं कामकाज ११ वाजेपर्यंत म्हणजे १ तासासाठी तहकूब केलं.

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने देशाने एका महान पार्श्वगायिकेला आणि एका उमद्या व्यक्तिमत्वाला गमावले आहे. यामुळे जागतिक स्तरावरील भारतीय संगीत आणि चित्रपट क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. लतादीदींच्या निधनाने एका युगाचा अंत झाला आहे. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असं सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी