30 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeटॉप न्यूजBhagat Singh Koshyari : राज्यपालांनी मोदी सरकारच्या सुचना बसविल्या धाब्यावर

Bhagat Singh Koshyari : राज्यपालांनी मोदी सरकारच्या सुचना बसविल्या धाब्यावर

टीम लय भारी

मुंबई : ‘महाविकास आघाडी’ सरकारला सतत अडचणीत आणण्यासाठी टपलेल्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ( Bhagat Singh Koshyari ) यांनी चक्क मोदी सरकारच्या सुचना धाब्यावर बसविल्या आहेत.

नियमांच्या नावाखाली राज्य सरकारला सतत टोचण्या देणाऱ्या राज्यपालांनी ( Bhagat Singh Koshyari ) स्वतःच्या चुकाही पाहायला हव्यात, अशी भावना सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना व्यक्त केली.

Mahavikas Aghadi

केंद्राचा सामाजिक न्याय विभाग व एम्स रूग्णालयाने एकत्रितपणे ज्येष्ठ नागरिकांसाठी सल्लावजा मागदर्शक सुचना जारी केल्या आहेत. एप्रिल महिन्यातच या सुचना जारी केल्या आहेत.

‘कोरोना’चा सर्वाधिक धोका ज्यांना आहे, त्यात वयोवृद्धांचा समावेश आहे. त्यामुळे वयोवृद्धांविषयी गांभिर्याने काळजी घेण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने या सूचना जारी केल्या आहेत. ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा नागरिकांनी ‘कोरोना’ आपत्तीमध्ये काय काळजी घेतली पाहीजे, याबाबत या सुचनापत्रात मुद्देनिहाय मांडणी केली आहे.

ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आलेल्या पाहुण्यांना भेटू नये, फारच महत्वाची भेट असेल तर 1 मीटरचे अंतर ठेवावे यांसह अनेक महत्वाच्या सुचना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केल्या आहेत. या सगळ्या सुचना तळागाळात पोहोचविण्यासाठी केंद्राने कसोशीने प्रयत्न केले आहेत.

पण भगत सिंग कोश्यारी ( Bhagat Singh Koshyari ) यांनी या सुचना धाब्यावर बसविण्याचा सपाटाच लावला आहे. कोश्यारी यांचे वय तब्बल 77 वर्षे आहे. त्यांनी या सुचनांचे काटेकोर पालन करून स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यायला हवी. त्यांनी या सुचनांचे पालन करून महाराष्ट्रातील जनतेसमोर आदर्श ठेवायला हवा.

पण कोश्यारी ( Bhagat Singh Koshyari ) हे नियमितपणे विविध राजकीय नेत्यांना भेटण्यासाठी बोलवू लागले आहेत. एवढेच नव्हे तर, भेटायला आलेल्या नेत्यांसोबत 1 मीटरचे अंतर ठेवण्याच्या सुचनांचेही त्यांनी पालन केले नसल्याचे छायाचित्रातून स्पष्ट झाले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निवेदन स्विकारतानाचे एक छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. यात राज्यपालांच्या ( Bhagat Singh Koshyari ) एका बाजूला देवेंद्र फडणवीस, अतुल भातखळकर आहेत. दुसऱ्या बाजूला विनोद तावडे व आशिष शेलार आहेत. या सगळ्यांमध्ये एक मीटरपेक्षा जास्त अंतर ठेवण्याच्या सुचनांचे बिल्कूल पालन झालेले दिसत नाही.

( केंद्राने केलेल्या सुचनांचे परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा )

राजकीय नेत्यांच्या भेटी घेणे धोकादायक

राज्यपाल कोश्यारी यांनी आतापर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, संजय राऊत, अतुल भातखळकर, नारायण राणे, आशिष शेलार, विनोद तावडे यांच्या भेटी घेतल्या आहेत.

या सगळ्या नेत्यांचा बाहेरच्या लोकांशी संपर्क आलेला आहे. हे नेते घराबाहेर वावरलेले आहेत. असे असताना राज्यपालांनी कोणतेही तातडीचे कारण नसताना या नेत्यांना सतत भेटायला बोलविणे चुकीचे असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Bhagat Singh Koshyari
सोशल डिस्टन्शिंगच्या तीन तेरा वाजविल्याचे या फोटोत दिसत आहे

अधिकाऱ्यांसोबतही बैठका

राज्यपाल कोश्यारी ( Bhagat Singh Koshyari ) यांनी वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या आहेत. पण याच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांसोबत काम करणाऱ्या दोन आयएएस अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लागण झालेली आहे. त्यामुळे एखाद्या अधिकाऱ्यांमार्फत ‘कोरोना’चा विषाणू सहजपणे राजभवनात दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोश्यारी यांचे वय 77 वर्षे आहे. त्यामुळे आलेला विषाणू कोश्यारी यांच्यासाठी घातक ठरू शकतो. तरीही राज्यपाल ( Bhagat Singh Koshyari ) कोश्यारी बेजबाबदारपणे वागत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र लिहिले होते. त्यात शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊ नयेत अशी विनंती केली होती. पण यांत आपल्याला डावलले, आयोगाच्या सुचनांचे पालन केले नाही असा आरोप राज्यपाल यांनी केला होता.

नियमांचा बडगा उगारून राज्यपालांनी ( Bhagat Singh Koshyari ) उदय सामंत यांच्याबद्दल मोठी आदळआपट केली होती. सामंत यांना नियम दाखवत असतानाच स्वतःकडूनही केंद्राच्या सुचनांचे उल्लंघन केले जात असल्याचे राज्यपालांनी ( Bhagat Singh Koshyari ) ध्यानी घेतले नसल्याच्या भावना या सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना व्यक्त केल्या.

हे सु्द्धा वाचा

Sharad Pawar meets Uddhav Thackeray : शरद पवार मातोश्रीवर, राजकीय वर्तुळात खळबळ

IAS मनिषा म्हैसकरांच्या घरी दोन चिमुकल्या मुली, तरीही अधिकारी म्हणून ‘कोरोना’च्या लढाईत आघाडी

माजी IAS अधिकाऱ्याने आईच्या पुण्यतिथीच्या खर्चाची रक्कम दिली CM फंडाला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी