31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजपाताळयंत्री किरीट सोमय्यांना पोलिसांची नोटीस

पाताळयंत्री किरीट सोमय्यांना पोलिसांची नोटीस

टीम लय भारी

बीड : रेमडिसिव्हीरमागे उद्धव ठाकरे यांना 1 हजार रुपये मिळायचे. अजित दादांनी जरंडेश्वर लुटला आणि धनजंय मुंडे यांनी जगमित्र कारखाना लुटला. तब्बल 83 कोटी रुपये शेतकऱ्यांकडून घेतले, असा आरोप गुरुवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अंबाजागोई येथे बोलताना केला. यावेळी पोलिसांनी पाताळयंत्री किरीट सोमय्यांना नोटीस देऊन चांगलाच दणका दिला(Kirit Somaiya, police notice to him).

सोमय्या म्हणाले, काल मी ईडीकडे तकार केली आहे. मृत माणसांच्या नावावर पैसे लुटले. पोलिसांचा उपयोग माफियासारखा करत आहेत. मी बर्दापूर पोलीस ठाण्याला जावून पोलिसांना विनंती करणार आहे. फसवणूक केली असेल तर मी सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

किरिट सोमय्यांच्या विरोधात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल! : अतुल लोंढे

नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाई करा, सोमय्यांचे थेट ठाकरे सरकारलाच आव्हान

सोमय्या म्हणाले की, मला धमकी देणारा शोधतोय. मात्र, अद्याप मिळाला नाही. धनंजय मुंडेंच्या बायका आणि लेकरे किती आहेत माहीत नाही. मी घोटाळे काढले की, मला मुर्दाबाद म्हणतात. इथे मात्र मिरचीची धमकी देण्यात आली. मी घोटाळा काढला. आता, तुझे मिरची लगे तो मै क्या करू, असे म्हणत त्यांनी टोलेबाजी केली. शिवाय हे सरकार म्हणजे चोर मचाये शोर, असल्याचा आरोप केला.

सोमय्या यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. राऊत यांना मी प्रश्न विचारला की, ईडीच्या कार्यालयात पाठीमागून 55 लाख रुपये घेऊन कोण गेले? संजय राऊत यांनी ईडीची नोटीस फाडली. मग कारवाईला भिऊन 55 लाख रुपयांचा चेक दिला. हे काय समजतात, मला माहित नाही. महाराष्ट्रात ज्यांनी-ज्यांनी घोटाळे केले त्यांची चौकशी होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्या नावावर अलिबाग येथे 19 बंगले बांधले. चोरी का माल वापस करणे से चोरी की सजा माफ नहीं होती, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरातील इमारतींबाबत धक्कादायक खुलासा

Nawab Malik Attacks Ex-MP Kirit Somaiya; Claims ‘a BJP Leader Will Be Arrested Next Week’

किरीट सोमय्या म्हणाले की, उपमुख्यमंत्र्यांची हजारो कोटींची संपत्ती सापडली आहे. अजित दादांनी जरेंडश्वर कारखाना लुटला आणि धनंजय मुंडेंनी जगमित्र लुटला. 83 कोटी रुपये शेतकऱ्यांकडून घेतले. काल मी ईडीकडे तकार केली आहे. मृत माणसांच्या नावावर पैसे लुटले. पोलिसांचा उपयोग माफियासारखा करत आहेत. मी बर्दापूर पोलीस ठाण्याला जावून पोलिसांना विनंती करणार आहे. फसवणूक केली असेल तर मी सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. धनंजय मुंडेंच्या कुटुंबांवर मला बोलायचे नाही. मात्र, अनिल देशमुख यांच्या ऑर्थर रोड खोली नंबर एकशेजारी आता खोली नंबर दोन बुक करून ठेवल्याचा इशारा त्यांनी दिला.

सोमय्या म्हणाले की, भावना गवळींनी 100 कोटींचा घोटाळा केला. त्याला आईचे नाव दिले. तुम्ही केलेल्या पापांची सजा आईला दिली. अजित पवारांची सजा ताई आणि माईला मिळणार. पैशाची लूट करताना पैसे कुठेही ठेवा. मात्र, आई, ताई आणि माईच्या नावाने फसवू नका, असे आवाहन त्यांनी केले. एसटी संपकरी सांगतात अनिल परब भेटत नाही. त्यांना महिन्याला 100 कोटींच्या वसुलीमुळे वेळ मिळत नाही. सारेच खालच्या पातळीवर जात आहेत. सर्व घोटाळे बाजांनी संजय राऊत यांच्याकडून शिकावे, असे आवाहनही त्यांनी केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी