30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रअतिवृष्टीमुळे रस्त्यांचे 1,800 कोटींचे नुकसान

अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे 1,800 कोटींचे नुकसान

टीम लय भारी
मुंबई : राज्यात काही दिवसांपूर्वी झालेली अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती यामुळे तसेच काही भागात दरड कोसळून झालेले भूस्खलन यामुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. (Landslide and flooding caused loss of 1,800 crores)

सार्वजनिक बांधकाम विभागाने पहाणीनंतर प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. त्यात एकुणात 1,800 कोटींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री मा. अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

Video : पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज कोल्हापुर दौऱ्यावर

माजी शाखा व्यवस्थापकाचा बँकेवर सशस्त्र दरोडा. एका महिलेचा मृत्यू

ते असेही म्हणाले, राज्यात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीमुळे आलेले पूर व दरडी कोसळल्यामुळे झालेले भूस्खलन यामुळे बरेच रस्ते तसेच पूल यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकट्या कोकण विभागात सर्वाधिक नुकसान झाले आहे. सुमारे 700 कोटी रुपयांचे नुकसान एकट्या कोकण विभागात झाले आहे.

पुणे विभाग, अमरावती विभाग, औरंगाबाद विभाग, नागपूर विभाग व नाशिक विभाग येथे सुद्धा काही प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळते. या विभागातील हानी झालेल्या प्रदेशांची पाहणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यानुसार मुख्य अभियंत्यांची व समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

Landslide
रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

काही ठिकाणी अजूनही पाऊस सुरू आहे व दरड कोसळलेल्या भागांत साफसफाई चालू आहे तर काही ठिकाणी नुकसान झालेल्या भागांची पाहणी ड्रोन कॅमेरा मार्फत छायाचित्रे घेऊन करण्यात येत आहे. व त्यानुसार प्राथमिक माहितीचा अंदाज घेतला जात आहे.

अंदाजे सुमारे 290 रस्ते वाहतुकीसाठी बंद होते तर 469 रस्त्यांवरील वाहतूक काही कालावधीसाठी बंद झाली होती. तसेच 140 पूल व मोऱ्या पाण्याखाली गेले होते.

Video : भास्कर जाधव तुझी औकात 2024 ला तुला दाखवून देऊ – निलेश राणे यांची बोचरी टीका

Delhi: Yamuna river breaches danger mark; flood alert issued

अंतिम पाहणी अहवालानुसार नुकसान रकमेत वाढ होण्याची शक्यता असल्याचे समजते. येत्या मंगळवारी 3 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाची मुंबई येथे बैठक होणार असून त्यावेळीही राज्यातील परिस्थिती चा पुन्हा आढावा घेण्यात येईल.

त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग नुकसानीबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दुरध्वनीच्या माध्यमातून चर्चा झाली असल्याचे अशोक चव्हाण यांनी संगीतले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी