27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeआरोग्यआदित्य ठाकरेंचे कार्बन संतुलित शहरांसाठी प्रयत्न

आदित्य ठाकरेंचे कार्बन संतुलित शहरांसाठी प्रयत्न

टीम लय भारी

मुंबई : माझी वसुंधरा अभियान 2.0 आणि कार्बन न्यूट्रल या विषयांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. पर्यावरण रक्षणाच्या कार्यात शहरांनी पुढाकार घ्यावा. असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. (Environment Minister Aditya Thackeray to discuss my Vasundhara Abhiyan 2.0 and Carbon Neutral)

या बैठकीस विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या. त्याच बरोबर पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे सुद्धा उपस्थित होते.

योगी आदित्यनाथ यांची भविष्यवाणी, मी पुन्हा येईन!

खड्ड्यांचे फोटो वॅाट्सअप करा आम्ही होऊ तुमचे माध्यम म्हणत, केले भाजप आमदारांनी नागरीकांना आव्हान

पर्यावरणाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. कार्बन हा जीविताला हानिकारक असा घटक आहे. परंतु मानवनिर्मित तसेच निसर्गनिर्मित बऱ्याच गोष्टींतून कार्बन उत्सर्जित होतो. त्याच प्रकारे काही नैसर्गिक क्रियांमार्फत कार्बन शोषून देखील घेतला जातो. परंतु सध्याच्या काळात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कार्बन शोषून घेण्याच्या प्रमाणापेक्षा अधिक आहे.

कार्बन ऑक्साईड वातावरणातून काढून टाकणे आणि नंतर साठवणे याला कार्बन सीक्वेस्ट्रेशन म्हणतात. निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्यासाठी सर्व जगभरातील हरितगृह वायू (जीएचजी) उत्सर्जन कार्बन सीक्वेस्ट्रेशनद्वारे संतुलित करावे लागेल. आणि तसे केल्यास शहरे कारबन न्यूट्रल होतील.

जगात फक्त भूतान आणि सुरिनाम हे दोन देशच कार्बन संतुलित आहेत.

सरपंच परिषदेचे मोठे यश, 72000 प्रति वर्ष वाचले

Environment
आदित्य ठाकरेंचे कार्बन संतुलित शहरांसाठी प्रयत्न

‘Alternative Nobel’ for Indian organisation

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी