28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमंत्रालयपीडब्ल्यूडीचा प्रताप; कनिष्ठ अधिकाऱ्याकडे वरिष्ठाची जबाबदारी, ती सुद्धा हद्द बदलून

पीडब्ल्यूडीचा प्रताप; कनिष्ठ अधिकाऱ्याकडे वरिष्ठाची जबाबदारी, ती सुद्धा हद्द बदलून

टीम लय भारी

मुंबई : घोटाळे व गैरप्रकार करण्याची नानाविध कौशल्ये सार्वजनिक बांधकाम खात्याकडे (पीडब्ल्यूडी) आहेत ( PWD set corruption practices ). असाच एक भन्नाट गैरप्रकार ‘लय भारी’च्या हाती आला आहे.

सुरेश डावखर नावाचे एक कनिष्ठ अभियंता पीडब्ल्यूडीमध्ये कार्यरत आहेत. इलाखा शहरमधील मध्य उपविभागामध्ये डावखर काम करतात ( PWD Engineer Suresh Dawkhar ). किल्ला कोर्टची कामे त्यांच्या कार्यकक्षेत येतात.

कनिष्ठ अभियंता असलेल्या डावखर यांच्यावर सरकारने आता मोठी मेहरबानी केली आहे. त्यांना थेट उप अभियंत्याची जबाबदारी बहाल करून टाकली आहे ( Maharashtra government has given additional charge to Suresh Dawkhar as a PWD engineer ). विशेष म्हणजे, पश्चिम उप विभागाच्या उप अभियंत्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

खळबळजनक : पीडब्ल्यूडीतील मोठा घोटाळा, घोटाळेबाज अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी मंत्रालयात शिजतेय कारस्थान

मंत्री जयंत पाटील, धनंजय मुंडे सरकारी बंगल्याबाहेर; पीडब्ल्यूडीच्या कारभाराचा नमुना

सनदी अधिकारी कंत्राटदारावर मेहरबान, पीडब्ल्यूडीत ३५८ कोटीचा घोटाळा

पीडब्ल्यूडी भ्रष्टाचार : फडणवीस सरकारने 90 कोटींची खोटी बिले अडवली, ठाकरे सरकारने ती ‘कोरोना’ काळात मंजूर केली

Three PWD officials caught by ACB

डावखर मध्य उपविभागात कनिष्ठ अभियंता पदावर काम करतात. पण त्यांना पश्चिम उप विभागातील उप अभियंता या मलईदार पदाची जबाबदारी दिल्यामुळे पीडब्ल्यूडीतील ( PWD ) अन्य अधिकाऱ्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत.

पश्चिम विभाग म्हणजे, मलबार हिल परिसर. या परिसरात मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बंगले व निवासस्थाने येतात.

व्हीआयपींच्या निवासस्थानांची अफाट कामे या कार्यक्षेत्रात होत असतात. त्यामुळे यथेच्छ ‘मलई’ ओरपण्यास मिळते. त्यामुळे पीडब्ल्यूडीच्या ( PWD ) प्रत्येक अभियंत्याला अशी जागा हवीहवीशीच वाटते.

सुरेश डावखर यांची उप अभियंता या पदावर अद्याप पदोन्नती झालेली नाही. त्यांची पश्चिम उपविभागात रितसर बदली सुद्धा झालेली नाही. ते मध्य उपविभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. तरीही त्यांना पश्चिम उपविभागातील एवढे महत्वाचे पद कुणाच्या आशिर्वादामुळे मिळाले असा सवाल आता करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, डावखर यांनी कामे देताना अनेक कंत्राटदारांकडून ‘कट’ मारलेला आहे. तरीही डावखर या कंत्राटदारांची बिले अदा करीत नाहीत. त्यामुळे बांधकाम भवन परिसरात कंत्राटदार डावखर यांच्याविषयी संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

डावखर हे सुमार दर्जाचे अधिकारी आहेत. ते फार प्रभावी काम करतात, असा त्यांचा इतिहास नाही. तरीही त्यांना बेकायदेशीरपणे उप अभियंत्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. दांडगा वशिला असल्याशिवाय अशी जबाबदारी दिलीच जाऊ शकत नाही, अशीही नाराजी बांधकाम भवनमध्ये व्यक्त केली जात आहे.

याबाबत डावखर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपल्याला मिळालेल्या उप अभियंता पदाच्या जबाबदारीचे खापर सरकारवर फोडले. ‘सरकारनेच माझ्याकडे ही जबाबदारी दिली आहे. तो सरकारचा निर्णय आहे’, असे डावखर म्हणाले. ‘माझी उप अभियंता म्हणून पदोन्नती झाली आहे. पण अद्याप नियुक्ती मिळालेली नाही’, अशीही सारवासारव त्यांनी केली.

आमचा ‘यू ट्यूब’ चॅनेलही सबस्क्राईब करा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी