31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeटॉप न्यूजक्रिकेटच्या यॉर्कर किंगला आयसीसीने दिली मानवंदना

क्रिकेटच्या यॉर्कर किंगला आयसीसीने दिली मानवंदना

टीम लय भारी

मुंबई : श्रीलंकेचा यॉर्कर किंग लसिथ मलिंगाला आयसीसीने मानवंदना दिली आहे. आयसीसीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून मलिंगाचा आतापर्यंतचा संपूर्ण प्रवास दाखवला आहे. क्रिकेटमध्ये त्याने केलेली यॉर्कर्स गोलंदाजीची फटकेबाजी या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे (Lasith Malinga has been honored by the ICC).

मलिंगाने मंगळवारी क्रिकेटच्या सर्व प्रकारच्या खेळातून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर त्याला सर्व स्थरातून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. आयसीसीने सुद्धा मागे न राहता मलिंगाला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देत, मलिंगावर आधारीत एक व्हिडिओ बनवून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आयसीसीने मलिंगाच्या आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट यॉर्करचा एक प्रवास दाखवला आहे.त्याचबरोबर व्हिडीओखाली एक मथळा लिहला आहे ज्यात लिहिले आहे की, ‘किंग ऑफ द यॉर्कर’. म्हणजेच यॉर्करचा किंग मलिंगा.

महेंद्रसिंग धोनीच्या कमबॅकविषयी जय शाह यांनी विराट- रोहितशी केली होती चर्चा

बुमराहला ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मन्थ’ पुरस्कारासाठी नामांकन

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

 

वेगवान गोलंदाज मलिंगा त्याच्या यॉर्कर गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याने आपल्या गोलंदाजीतून भल्या भल्या फलंदाजांची बोटे चिरडत आणि स्टंप उडवत त्यांना पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला आहे. त्याचबरोबर त्याने आयपीएलमध्येही उत्कृष्ट कामगिरी करत मुंबई इंडिअन्सला मदत केली होती.

चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात… भारतीय गोलंदाजांकडे सर्वांचे लक्ष

REVEALED: Why Sri Lankan star bowler Lasith Malinga used to ‘kiss’ the ball

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी