30 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
HomeमुंबईLockdown2 : ‘आमदार कोळंबकरांच्या बेजबाबदारपणाबद्दल भाजप व देवेंद्र फडणवीस गप्प का ?’

Lockdown2 : ‘आमदार कोळंबकरांच्या बेजबाबदारपणाबद्दल भाजप व देवेंद्र फडणवीस गप्प का ?’

टीम लय भारी

मुंबई : ‘लॉकडाऊन’च्या ( Lockdown2 ) काळात आयपीएस अधिकाऱ्याच्या चुकीमुळे वाधवान कुटुंबियांना प्रवासाचे पत्र दिले होते. त्यावर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील व अन्य भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. असेच पत्र आमदार कालिदास कोळंबकर यांनीही एका महिलेला दिल्याचा प्रकार ‘लय भारी’ने चव्हाट्यावर आणला.

त्यावर कोळंबकरांच्या या बेजबाबदारपणाबद्दल भाजपचे नेते गप्प का आहेत ? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केला आहे.

मुंबईपासून संगमनेरपर्यंत जाण्यासाठी या महिलेला आमदार कालिदास कोळंबकर यांनी पत्र दिले होते. ‘लॉकडाऊन’मध्ये ( Lockdown2 ) प्रवास करण्यास बंदी आहे. अत्यंत तातडीचे काम असेल तरच पोलिसांकडून परवानगी दिली जाते. असे असतानाही केंद्र व राज्य सरकारचे नियम धाब्यावर बसवून कालिदास कोळंबकर यांनी एका महिलेला प्रवासाचे पत्र दिले.

या पत्राच्या आधारे संबंधित महिलेने प्रवास सुद्धा केल्याचा धक्कादायक प्रकार ‘लय भारी’ने चव्हाट्यावर आणला होता. ‘लय भारी’ने ही खळबळजनक बातमी प्रसिद्ध केल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी एक ट्विट जारी केले आहे, तसेच त्यांनी कारवाईच्या मागणीचा संदेशही व्हायरल केला आहे.

Lockdown2
आमदार कोळंबकर यांनी दिलेले हेच ते बेकायदा पत्र

‘भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी बेकायदेशीर कृत्य केले आहे. सामान्य लोकांचे आयुष्य संकटात टाकणाऱ्यावर सरकार कारवाई करणार का ? वाधवान प्रकरणात चूक अधिकाऱ्यांची असताना देवेंद्र फडणवीस मंत्र्यांचा राजीनामा मागत होते. भाजप आमदार कायदा तोडून प्रवासाचे पत्र देतात. त्या पत्रावर प्रवास सुद्धा पूर्ण केला जातो. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व भाजपने आमदार कोळंबकर यांच्यावर कारवाई करावी’ असे डॉ. वाघमारे यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/drrajuwaghmare/status/1253371971590651906?s=20

‘होम कॉरन्टाईन’चा हातावर शिक्का असतानाही महिलेला प्रवासाचे पत्र

मुंबई ते संगमनेर असा प्रवास करण्यासाठी आमदार कालिदास कोळंबकर यांनी पत्र दिलेल्या महिलेच्या हातावर ‘होम कॉरन्टाईन’चा शिक्का होता. तरीही कोळंबकर यांनी सदर महिलेला प्रवासाचे पत्र कसे काय दिले असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

कोळंबकर यांच्या पत्राच्या आधारे सदर महिला त्या दिवशी ( Lockdown2 ) संगमनेरमध्ये पोचली होती. तिथे ती शिक्षण घेते. त्यासाठी तिने भाड्याने घर घेतलेले आहे. ‘लॉकडाऊन’च्या संवेदनशील काळात अचानक मुंबईवरून संगमनेरमध्ये आलेल्या या महिलेला तिच्या घर मालकाने थांबू देण्यास विरोध केला. तरीही ती महिला आमदारांचे पत्र दाखवून हुज्जत घालू लागली. त्यानंतर तिथे आणखी काही लोक जमा झाले. महिलेच्या हातावर ‘होम कॉरन्टाईन’चा शिक्का असल्याचे सगळ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे लोकांनी तहसिलदार कार्यालयाशी संपर्क साधला. तहसिलदार कार्यालयातून एक कर्मचारी तातडीने घटनास्थळी आले. या कर्मचाऱ्यासोबतही संबंधित महिलेने आमदारांचे पत्र दाखवून हुज्जत घातली. स्थानिकांनी सदर महिलेला तिथे राहण्यास तीव्र विरोध केल्यामुळे ती अखेर पुन्हा मुंबईला परतल्याचे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

Lockdown2 : भाजप आमदाराच्या पत्रावर मुंबई ते संगनमेर महिलेचा प्रवास

#PalgharLynchingTruth : फडणवीसांच्या काळात धुळ्यात 5, चंद्रपूरात एका गोसाव्याची हत्या झाली होती : शिवसेनेचे टीकास्त्र

Covid-19: IPS officer who helped DHFL’s Wadhawans escape sent on leave

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी