29 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरमहाराष्ट्रमंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी; मुख्यमंत्र्यांवर अन्य मंत्री वैतागले !

मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी; मुख्यमंत्र्यांवर अन्य मंत्री वैतागले !

टीम लय भारी

मुंबई : राज्यातील नव्या भाजप-शिंदे सरकारला एक महिना होत आलेला असला तरी अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार (cabinet meeting) करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वांचेच लक्ष या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागून राहिले आहे. पण विरोधकांकडून मात्र या मंत्रिमंडळाच्या विस्तारात होणाऱ्या विलंबाबाबत खोचक टीका टिपण्णी करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी शिंदे सरकारसाठी एक खोचक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सर्वच खात्यातील मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख केला आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच सर्व निर्णय घेत असल्याने मंत्री मंडळातील इतर नेत्यांनी त्यांच्या विरोधात नाराजी दर्शविल्याचे या ट्विटमधून सांगण्यात आले आहे.

हे निर्णय घेत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील तिथे उपस्थित होते. पण त्यांच्याकडे कोणत्याच खात्याचा पदभार नसल्याने ते यावेळी या मंत्रिमंडळातील खडाजंगी ( cabinet meeting; Other ministers were upset with the Chief Minister) शांत राहून पाहात होते, असा टोला देखील सुरज चव्हाण यांनी या ट्विटच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. सुरज चव्हाण यांनी गृहराज्य मंत्री, नगरविकास मंत्री, महसूल मंत्री आणि ग्रामविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख केला आहे.

दरम्यान, महिना होत आला तरी, अद्यापही या सरकारने मंत्री मंडळाचा विस्तार केलेला नाही. ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करताना आणि शिवसेनेतून आमदार पळविताना घाई केली होती. तितकीशी घाई ते मंत्री मंडळाचा विस्तार करताना दिसून येत नाहीयेत. इतकेच नाही तर अवघ्या २४ दिवसांत या दोन डोक्यांच्या सरकारने ५०० पेक्षा अधिक शासन निर्णय घेतले आहेत. दर दरदिवशी या सरकारकडून मंत्री मंडळ विस्ताराबाबत काहीतरी नवनवीन ऐकिवात येत असल्याने नागरिकांमध्ये सुद्धा या सरकारविषयी आता नाराजी दिसू लागली आहे.

हे सुद्धा वाचा :

शिंदे गट – भाजपचे अखेर ठरले! आगामी निवडणुकीत ‘या’ महापालिकेसाठी करणार युती

सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे हाती बांधणार शिवबंधन

अजित पवारांची थेट शेतकऱ्यांसोबत बांधावर चर्चा

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!