34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयमाजी मंत्री महादेव जानकर शेतात तण काढताहेत, औत चालवताहेत, अन् रोपेही लावताहेत

माजी मंत्री महादेव जानकर शेतात तण काढताहेत, औत चालवताहेत, अन् रोपेही लावताहेत

टीम लय भारी

मुंबई : सामान्य कुटुंबातील महादेव जानकर यांचे पाय अद्यापही जमिनीवरच आहेत. माजी मंत्री, विद्यमान आमदार व पक्षाध्यक्ष अशा उच्च पदांवर काम केले तरीही त्यांनी शेतीसोबतचे नाते तोडलेले नाही ( Mahadev Jankar working in farm ).

गेल्या महिनाभरापासून महादेव जानकर बीडमधील गुंठेगाव ( ता. गेवराई ) येथे मुक्कामी आहेत. त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमोडे यांच्या घरी ते आहेत.

Mahadev Jankar wors in Farm
शेतकऱ्यांसोबत निवांत क्षण घालवताना महादेव जानकर

या मुक्कामात जानकर हे वाघमोडे यांच्या शेतात राबत आहेत. शेतात ते नियमितपणे काम करतात. औत चालविणे, शेतातील तण काढणे, सिताफळींची लागवड करणे अशी ती कामे करतात. घरात पाणी सुद्धा भरतात. शेतातील पाण्याची मोटर चालू – बंद करतात. वाघमोडे यांनीच ही माहिती ‘लय भारी’ला दिली.

मंत्रीपदावर राहिलेली एवढी मोठी व्यक्ती आमच्या घरी काम करते. त्यामुळे आम्हाला अवघडल्यासारखे होते. साहेब, तुम्ही काम करू नका. तुम्ही निवांत घरी राहा असे आम्ही सगळेजण वारंवार त्यांना सांगतो. पण जानकर साहेब ऐकत नाहीत. ‘मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला शेतातील सगळी कामे जमतात. तुमच्यासोबत मी काम करणार’ असे ते म्हणतात.

Mahadev Jankar works with Farmer

Mahadev Jankar works in farm
औत चालवताना महादेव जानकर

माझे आई – वडिल, भाऊ, वहिणी यांच्यासोबत ते जमिणीवर बसून साध्या पद्धतीने जेवण घेतात. जे आम्ही जेवण घेतो, तेच जेवण जानकर सुद्धा घेतात. साध्या शेतकऱ्याप्रमाणे गेले 36 दिवस ते आणच्या घरी काम करीत असल्याचे वाघमोडे म्हणाले ( Mahadev Jankar visits to Beed ).

दरम्यान, जानकर यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते वांग्याच्या शेतातील तण काढतानाचे छायाचित्र आहे. जमा झालेल तण ते बैलगाडीमध्ये भरत आहेत, आणि बैलगाडीतून घेऊन जात आहेत. त्यांच्यासोबत एक लहान मुलगा बैलगाडी हाकताना दिसत आहे.

Mahadev Jankar with farmer
महादेव जानकर जेवण करताना

महादेव जानकर यांचा प्रवास

जानकर यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील पळसावडे (ता. माण) हे आहे. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. धनगर समाजाचे कल्याण करायचे अशी जिद्द बांधून त्यांनी तरूण वयातच घरदार सोडले ( Mahadev Jankar works for Dhangar and Bahujan community ). ‘यशवंत सेना’ नावाची संघटना स्थापन करून राज्यात व राज्याबाहेर त्यांनी धनगर व इतर अठरा पगड जातीच्या तरूणांची मोठ बांधली.

Mahadev Jankar in beed
चहाच्या टपरीवर स्वतःच हाताने चहा घेताना महादेव जानकर

हे सुद्धा वाचा

महादेव जानकरांना काँग्रेसकडून ऑफर, ‘या’ नेत्याने जानकरांवर उधळली स्तुतीसुमने

आठवले, जानकर, खोत, मेटे यांनीही मागितला सत्तेत वाटा

महादेव जानकरांच्या गावात प्रभाकर देशमुख, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत साधला संवाद

Mahadev Jankar with farmers
गोदावरी नदीत होडीतून शेतकऱ्यांसोबत रफेट मारताना महादेव जानकर

पुढे त्यांनी ‘राष्ट्रीय समाज पक्ष’ स्थापन केला. सन 2009 मध्ये त्यांनी माढा मतदारसंघातून शरद पवार यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढविली होती. सन 2014 मध्ये त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामतीमधून निवडणूक लढविली ( Mahadev Jankar has contested election against Sharad Pawar and Supriya Sule ).

Mahavikas Aghadi

बारामतीमध्ये जानकर यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. चार लाखांच्या वर जानकर यांना मते मिळाली. सुप्रिया सुळे यांना अवघे 50 हजार मताधिक्य मिळाले होते. सुळे यांचा निसटता विजय झाला होता.

Mahadev Jankar with farmer
रानमेवा खाताना महादेव जानकर

सन 2009 मध्ये भाजप सत्तेवर आले. भाजपने जानकर यांना विधानपरिषदेची आमदारकी दिली. नंतर पशू संवर्धन, मत्स्य व दुग्ध विकास मंत्री बनविले ( Mahadev Jankar was Minister in BJP government ). सन 2016 मध्ये जानकर यांना पुन्हा भाजपने आमदार बनविले. सध्या जानकर हे विधानपरिषदेचे आमदार आहेत.

Mahadev jankar in farm
शेतात फळझाडे लावताना महादेव जानकर

भाजपने सन 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जानकर यांच्या ‘राष्ट्रीय समाज पक्षा’ला एकाही जागेवर तिकीट दिले नाही. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षात भाजपविषयी सध्या नाराजी आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी