31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रछगन भुजबळ यांनी दत्तात्रय भरणेंचा केला सत्कार

छगन भुजबळ यांनी दत्तात्रय भरणेंचा केला सत्कार

टीम लय भारी 

नाशिक:  नाशिकच्या कालिदास कालामंदिर येथे पुण्यश्लोक फाउंडेशन आयोजित हिंदुस्थानचा युगपुरुष श्रीमंत सुभेदार ‘मल्हारराव होळकर’ जन्मोत्सव सोहळा मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (datta bharne) यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते राज्यमंत्री दतात्रय भरणे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

भुजबळ यांनी म्हटलं की, माझ्या राजकीय जडणघडणीत धनगर समाजाचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. ओबीसी प्रश्न आला की तुमचा आमचा आवाज एक असला पाहिजे. ओबीसी समाजातील जाती आणि पोटजातींनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे.राज्यातील ५४ टक्के समाज एकत्र आला तर राज्याचे आणि देशाचे चित्र वेगळं असेल. धनगर समाजाच्या प्रश्नांबाबत आपण मंत्रिमंडळात मांडून ती सोडविली जाईल. समाजात फूट न पाडता एकत्रित येऊया असे त्यांनी सांगितले. तसेच चांदवडच्या रंगमहालाचे काम पर्यटन मंत्री असतांना सुरू केले आहे, लवकरच या कामाचा आढावा घेऊन उर्वरित काम मार्गी लावले जाईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले

मात्र, आपसांतील भांडणांमुळे ही लढाई अवघड बनेल. ती जिंकण्यासाठी ओबीसींमधील विविध उपजातींनी एकत्र येणे व राहणे गरजेचे आहे. असे मत राज्याचे अन्नपुरवठा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी येथे केले. यावेळी भुजबळ अध्यक्षस्थानाहून बोलत असे म्हटले की, छोट्या समाजात नेता तयार होणे अवघड असतानाच. आपसांतील लढाईमुळे ते कठीण होत असल्याचे सांगत सर्वांनी एकत्र राहण्याचा सल्लाही भुजबळ यांनी यावेळी दिला आहे.

.छगन भुजबळ यांनी दत्तात्रय भरणेंचा केला सत्कार

यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, काम करतांना सर्वांना सोबत घेण्याचा माझा प्रयत्न असतो. भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असून ओबीसी समाजाच्या प्रश्नांची सोडविण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी एकसंघटीत होऊन काम करावे असे आवाहन त्यांनी समाज बांधवांना केले. ते म्हणाले की, कोरोनामुळे राज्यातील तिजोरीवर ताण निर्माण झाला त्यामुळे अनेक कामे प्रलंबित राहिली आहे. मात्र येणाऱ्या काळात सर्व कामे मार्गी लावण्यात येतील. समाजाचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी