33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रविराट-अनुष्काच्या मोहिमेला अजून दोन दिवस बाकी जमा झाले 11 कोटी

विराट-अनुष्काच्या मोहिमेला अजून दोन दिवस बाकी जमा झाले 11 कोटी

टीम लय भारी

मुंबई :- संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या कोरोनाच्या भीषण परिस्थितीत आरोग्याच्या सुविधा देखील अपुऱ्या पडत आहे. अशा या कोरोनाच्या भीषण परिस्थितीत विराट कोहली आणि अनुष्का शर्मा कोरोना लढ्यात हातभार लावण्यासाठी एक चळवळ उभी केली. विराट-अनुष्काने या चळवळीतून 11 कोटी निधी गोळा केला आहे (Virat-Anushka has raised Rs 11 crore from this movement).

विराट सदिच्छादूत असलेल्या MPL या फँटसी लीग अॅपने 5 कोटींची मदत जाहीर केली. त्यामुळे 7 कोटींचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन विराट व अनुष्का यांनी सुरू केलेल्या या चळवळीतून आता 11 कोटी निधी गोळा झाला आहे. विराटने सोशल मीडियावरून ही आनंदाची बातमी दिली (Virat shared the good news on social media).

केंद्राने लसीकरणाचे ओझे टाकले राज्यांच्या खांद्यावर निधीचे काय झाले : रोहित पवार

निवडणुका संपल्या की पेट्रोल-डिझेलचे दर वाढतात : जयंत पाटील

”MPL Sports Foundation चे मी आभार मानू इच्छितो. आम्ही सुरू केलेल्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी त्यांनी 5 कोटींची मदत केली आहे. त्यांच्या या मदतीमुळे आम्ही आमचे लक्ष्य 11 कोटींपर्यंत वाढवले आहे. अनुष्का (Anushka) आणि मी तुमचा पाठींबा पाहून भावूक झालो आहोत,”असे विराटने (Virat) ट्विट केले.

देशातील आरोग्य यंत्रणा न थकता, न थांबता कोरोना व्हायरसशी मुकाबला करत आहेत. पण, आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आपल्या आरोग्य यंत्रणेलाच आव्हान दिले आहे. आता आपण सर्वांनी एकत्र येऊन भारताला मदत करण्याची गरज आहे. अनुष्का (Anushka) आणि मी Ketto वर एक मोहीमु सुरू केली आहे. त्यातून जमा होणार निधी हा कोरोना लढ्यासाठी वापरला जाणार आहे, असे आवाहन विराट-अनुष्काने (Virat-Anushka) केले होते.

Explained: How Indian states misreport their Covid-19 death toll

विराट कोहलीचा (Virat Kohli) आयपीएलमधील संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हे ही कोरोना लढ्यासाठी काम करत आहेत. चेन्नई सुपर किंग्सने तामिळनाडू सरकारला 450 ऑक्सिजन संच दिले, सनरायझर्स हैदराबादने 30 कोटी, तर राजस्थान रॉयल्सने 7.5 कोटींची मदत केली. शिवाय पॅट कमिन्स, ब्रेट ली, सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे, शेल्डन जॅक्सन, शिखर धवन आदी खेळाडूंनीही हातभार लावला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी