खारघर उष्माघात प्रकरणी आम आदमी पक्षाच्या याचिकेवर होणार सुनावणी

खारघर उष्माघात मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल न केल्या बद्दल महाराष्ट्र आम आदमी पार्टीने पनवेल कोर्टात धाव घेतली आहे. याची पुढील सुनावणी आता २६ मे, २०२३ रोजी होणार आहे. १६ एप्रिल, २०२३ रोजी, खारघर येथे झालेल्या, पदमश्री श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या, शासकीय सोहळा कार्यक्रमात १४ श्री सदस्यांचा उष्माघात, चेंगराचेंगरी मुळे मृत्यू, तसेच अनेकजण जखमी आणि आजारी पडलेत.

या दुर्घटनेबाबद १८ एप्रिल रोजी, सोहळ्याच्या आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी लेखी तक्रार आप महाराष्ट्र तर्फे खारघर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती. या संदर्भात खारघर पोलीस स्टेशनला स्मरणपत्रे देऊन सुद्धा, खारघर पोलिसनकडून काहीच कृती न झाल्याने, आप महाराष्ट्र तर्फे २४ एप्रिल ला नवी मुंबई आयुक्तांना भेटून लेखी स्मरणपत्र दाखल केले. पण त्यानंतरही काहीच कृती न झाल्याने, आप महाराष्ट्र ला नाईलाजास्तव पनवेल कोर्टात धाव घेतली आहे.

ही केस पनवेल कोर्टात दाखल झाली असून, बुधवार ३ मे, २०२३ रोजी प्रथम सुनावणी झाली. ह्या दुर्देवी घटनेबाबद, ठोस कृती न करता, राज्य सरकार एक सदस्यीय कमिटी नेमणे वैगेरे वेळकाढू उपाय अवलंबित आहे. ह्यावरून, सरकार हि दुःखदायक घटना विशष गांभीर्याने घेत नाही हे स्पष्ट होत आहे.

आम आदमी पार्टी महाराष्ट्रच्या वतीने, राज्य सचिव धनंजय शिंदे ह्यांनी तक्रार दाखल केली असून, मुख्य सचिव, सांस्कृतिक विभाग, खारघर पोलीस तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्त ह्यांना प्रतिवादी करण्यात आलं आहे.

१. देशाचे गृहमंत्री, महाराष्ट्र मुख्यमंत्री आणी उपमुख्यमंत्री उपस्थित असलेल्या ह्या कार्यक्रमाला सरकारी तिजोरीतून अंदाजे १३ कोटींचा खर्च दाखविण्यात आला आहे.

२. हवामान खात्या तर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत, ४३ अंश कडक उन्हात लाखो लोकांना ह्या सोहळ्यासाठी बसविण्यात आले. हा सोहळा, केवळ राजकीय फायद्यासाठी, अत्यंत बेजबाबदारपणे, पेंडॉल, प्रथमउपचार आणी पिण्याच्या पाण्याच्या सोयी शिवाय आयोजित करण्यात आला.

३. सरकार तर्फे, मृतांचा आकडा लपवून जबाबदारी झटकण्यासाठी असंवेदनशील विधाने करण्यात आली. मृतांचे पोस्टमॉर्टेम करण्यात सुध्दा हलगर्जी करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

गिरीश महाजन : एक धडाडीचे तडफदार नेतृत्व

‘ऋषी सुनक’ ठरतेय बेस्ट सेलर; दिंगबर दराडे लिखीत पुस्तकाला वाचकांचा उदंड प्रतिसाद

महाराष्ट्रातील सर्व पालकमंत्र्यांची पदे बोगस; सर्व पदे बरखास्त करण्याची प्रफुल्ल कदम यांची मागणी

आम आदमी पार्टी तर्फे अर्जात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत : 

१. या गुन्ह्या संदभात प्रतिवादीवर भारतीय दंड संहिता कलम ३०४, ३०८, ३३६, ३३७, ३३८, ११४ नुसार सदोष मनुष्यवधाचा आणी इतर गुन्हे दाखल करावे.

२. कलम १५६ (३) फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार, न्यायालयाने सदर दुर्घटना गम्भीरपणे घेऊन, पोलिसांना सखोल चौकशी अहवाल न्यालयात दाखल करण्याचे आदेश द्यावेत.

३. मृत्युमुखी पडलेल्या १४ श्री सदस्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी रु. १ कोटी नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच जखमींना रु. १० लाख इतकी नुकसान भरपाई देण्यात यावी.

या केससाठी, महाराष्ट्र आम आदमी पार्टी लीगल टीम, ऍड. जयसिंग शेरे, ऍड. सुवर्णा जोशी, ऍड. सादिक शिलेदार हे वरिष्ठ वकील ऍड असीम सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे.

 

सुधाकर काश्यप

Recent Posts

शहरातील जीर्ण वाड्याबाबत मनपा उदासीन; नागरिक धोक्यात

नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…

15 hours ago

सिडको गोळीबार प्रकरणातील ८ जणांवर मोक्का

गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना  माेक्का (MCOCA) लावण्यात आला…

15 hours ago

कर्नाटकातील अत्याचार हा नारीशक्तीचा अपमान;काँग्रेस प्रवक्ता प्रगती अहिर यांची भाजपावर टीका

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…

16 hours ago

सिडको विभागात सायकल रॅलीसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…

16 hours ago

पोटच्या मुलीलाच देहविक्रीस भाग पाडून तिच्या जन्मदात्यांनी विकलं

पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…

18 hours ago

अश्रू, तुझा खरा रंग कंचा ? रोहित पवारांचा की अजित पवारांचा ??

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…

19 hours ago