32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रFocus on vegetable business : भोजनदानानंतर भाजीपाला व्यवसायाकडे लक्ष; नेवाडीतील शेतक-यांचा उपक्रम

Focus on vegetable business : भोजनदानानंतर भाजीपाला व्यवसायाकडे लक्ष; नेवाडीतील शेतक-यांचा उपक्रम

अजित जगताप : टीम लय भारी

सातारा : कोरोना विषाणू संसर्गाचा अनेकांनी धसका घेतला आहे. सातारा जिल्ह्यात ६ हजार ९१६ रूग्ण दाखल झाले असून कोरोनामुळे १९ जणांचा बळी गेला आहे. ४८४ कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत आहेत. ते लवकर बरे होतील अशी आशा सर्वजण करीत आहेत. अशा संकटाच्या वेळी आनेवाडी येथील तरुण व निर्व्यसनी कार्यकर्ते सुनिल माणिकराव फरांदे या शेतक-याने गरिबांना भोजनदान केल्यानंतर स्वतःच्या भाजीपाला व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले (Focus on vegetable business) आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जावली तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या आनेवाडी गावामध्ये अनेक संकटग्रस्तांना मदत केली जाते. कोरोनाच्या लढ्यामध्ये सर्वजण सामील झाले असतानाच सायगाव, मोरघर या ठिकाणी कोरोनाबाधित सापडल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. अनेकांचा रोजगार बुडाला होता. अशा लोकांना जेवणाची भ्रांत होती. परंतु काही दानशूर व्यक्तींच्या मदतीने रायगाव, सायगाव, आनेवाडी, मोरघर, खर्शी, महिगाव, महामुलकरवाडी, दरे खुर्द, मेरूलिंग येथील गोरगरिबांना मोफत धान्य वाटप तसेच शिवथाळीच्या धर्तीवर मोफत जेवण देण्याचा संकल्प केला होता.

सध्या आनेवाडी येथील शेतकरी सुनील फरांदे, संतोष पिसाळ व इतरांच्या सहकार्याने एक वेळेची भात-आमटी गरीबांना देवून त्यांची भूक भागवत आहेत. त्याचबरोबर स्वत:च्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी कांदा, लसूनापासून ते आले, चवळीपर्यंत भाजीचे १८ वाण आनेवाडी गावातच विकत आहेत. सदरची भाजी ही सेंद्रिय व ताजी असल्याने (Focus on vegetable business) विविध भागातून लोक सामाजिक अंतर ठेवून या ठिकाणी भाजी खरेदीसाठी येत आहेत. दिवसभरात वीस ते तीस किलो प्रत्येक भाजी विक्री माफक दरात केली जात आहे. कोरोना लढ्यात सक्रीय भाग घेणा-यांना मोफत भाजी देण्याचाही संकल्प राबविण्यात येत आहे.

शेतकरी वर्ग हा ख-या अर्थाने कोरोनामुक्त म्हणून वावरत आहे. कारण रानातील कामांमुळे त्यांच्या शरिरात प्रतिकारशक्ती वाढलेली आहे. याउलट जे विविध आजारांनी ग्रासलेले आहेत तसेच नियमांचे पालन करित नाहीत अशा लोकांनाच कोरोना प्रार्दुभाव होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आजही ग्रामीण भागात ऊस लागण किंवा भात रोपण तसेच भांगलण आणि खत विस्कटणे ही कामे अंतर ठेवूनच केली जातात. त्यामुळे शेतक-यांना नैसर्गिक वरदान लाभलेले आहे. सायगाव भागातील दानशूर व्यक्ती व सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भोजनदान घेतले असून आम्ही फक्त वाडप्याचे काम करत आहे. खरे श्रेय हे दानशूर व्यक्तींचे आहे, असे सुनिल फरांदे व युवा कार्यकर्ते संतोष पिसाळ यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

Politics in Mantralaya : मंत्र्यांच्या पीएस, ओएसडींना सहा महिन्यांपासून पगारच नाहीत

चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ जनतेची माफी मागावी : काँग्रेस

मुंबई असुरक्षित राज्यकारभार नागपुरातून चालवा, ‘या’ काँग्रेस नेत्याची मागणी!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी