31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रसंजय राऊतांचा ‘या’ कारणामुळे  मोदी सरकारवर हल्ला!

संजय राऊतांचा ‘या’ कारणामुळे  मोदी सरकारवर हल्ला!

टीम लय भारी

मुंबई : शिवसेनेचे नेते केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात टीका करण्यासाठी एकही संधी सोडत नाही. विशेष म्हणजे शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत हे अग्रस्थानी असतात. राऊत यांनी देशाची अर्थव्यवस्थार वर्षभरापासून संकटात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे भाजप विरुध्द शिवसेना असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

राऊत म्हणाले, मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्था संकटात आली होतीच. गेल्या वर्षभरापासून ही अर्थव्यवस्था ढासळली आहे असंही राऊत यांनी स्पष्ट आहे. त्यांनी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्याबद्दल आम्ही त्यांचं कौतुकही केलं आहे असंही राऊत म्हणाले. सध्याच्या घडीला भारत पाकिस्तान, काश्मीर प्रश्न, भारत चीन प्रश्न मागे सोडून करोनाच्या संकटाचा सामना करण्याची गरज आहे. राजकारण आजच्या घडीला सगळ्यांनीच बाजूला ठेवलं पाहिजे. पुढील दोन वर्षे तरी आपल्याला राजकारण करणं सोडावं लागेल. राजकारण करण्यासाठी बराच काळ आहे. तूर्तास करोनाच्या संकटाशी लढलं पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ही वेळ राजकारण करण्याची नाही. तर करोनाच्या संकटाला सामोरं जाण्याचा काळ आहे. येत्या काळातही आम्हा सगळ्यांनाच राजकारण विसरून पुढे महाराष्ट्रासाठी काम करायचं आहे असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. आमचं सरकार पाच वर्षे टिकणार आहे याबद्दल माझ्या मनात काहीही शंका नाही असंही राऊत यांनी स्पष्ट केलं त्यामुळे केंद्रातील सत्ताधारी राऊतांच्या टीकेवर काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी