31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रउपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी भिलवडी पूरग्रस्तांची विचारपूस करत, केले सांत्वन

उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी भिलवडी पूरग्रस्तांची विचारपूस करत, केले सांत्वन

टीम लय भारी

मुंबई:- महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये महापूर आला आहे. त्यामुळे लोकांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सोमवार (ता.26) सांगली जिल्ह्यातील भिलवडी  निवारा केंद्रामध्ये येऊन येथील पूरग्रस्तांची विचारपूस करत त्यांचे सांत्वन केले. तुम्हाला जेवण मिळते का? किती वर्षानंतर तुमच्या भागात पाणी भरलं? अशी ज्येष्ठांकडे विचारपूस करताना शाळेला जाता का?, अशी चौकशीही अजितदादांनी लहानग्यांची केली (Ajit Pawar consoled the flood victims of Bhilwadi)

अजित पवार सोमवारी (ता.26) सकाळी 11च्या सुमारास भिलवडी येथे दाखल झाले. भिलवडीत प्रचंड पूर होता. त्यामुळे या भागातील नागरिकांना निवारा केंद्रात ठेवण्यात आलं आहे. अजितदादांनी थेट या निवारा केंद्रातच जाऊन तिथल्या व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी निवारा केंद्रातील ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस केली. तुम्ही जिथे राहता तिथे महापुराचे पाणी नेहमी येते का? पहिल्यांदाच पाणी आले का? पाणी आले तर किती वर्षानंतर आले? असे प्रश्न त्यांनी निवारा केंद्रातील लोकांना केले. तसेच तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला सर्व मदत देऊ, असे आश्वासनही त्यांनी दिली. निवारा केंद्रात तुम्हाला जेवण मिळते का? केंद्रातील व्यवस्था चांगली आहे का? असे प्रश्नही त्यांनी विचारले. तसेच लहान मुलांना जवळ बोलावून तुम्ही शाळेत जाता का? अशी चौकशीही त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांची सातारा, पाटण फेरी हुकली, पुढला प्रवास पुण्याकडे

तळीये गावातील अजूनही 32 नागरिक बेपत्ता; मृतांचा आकडा 53 वर, बचाव कार्य सुरूचं

भिलवडी गावातील पुरग्रस्तांच्या व्यथा ऐकल्यानंतर त्यांच्या पुनर्वसन आणि मदतीसाठी चांगला मार्ग काढण्याचे आश्वासन देत संकटाच्या काळात राज्य सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

Ajit Pawar consoled the flood victims of Bhilwadi
अजित पवार यांनी बोटीतून पुरामुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा 

भिलवडीमध्ये अजितदादा पवार यांनी बोटीतून पुरामुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा केला. भिलवडी बाजारपेठ पुर्णपणे पाण्याखाली आहे, पुरामुळे दुकानं पूर्णपणे पाण्याखाली बुडाल्याचं अजित पवार यांना पाहायला मिळाले. अजितदादा पवारांसोबत जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी पूरग्रस्तांशीही संवाद साधला (In Bhilwadi, Ajit Pawar toured the flood-hit area from a boat)

महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांना महाप्रलयाचा तडका, प्रिय दिल्लीश्वरांनी आपल्या दिलदारीचे प्रदर्शन करावे

Maharashtra Dy CM Ajit Pawar tours flood-hit villages in Sangli, uses boat to reach out to people

पाऊस होता त्यामुळे मी बायरोड सांगलीला आलो. सांगलीची पाहणी आणि बैठक करून साताऱ्याला जाणार. साताऱ्याची पाहणी आणि बैठक करून पुण्याला जाणार. पण तोपर्यंत हेलिकॉप्टर मिळालं आणि प्रशासनाने परवानगी दिली तर कोल्हापूरलाही चक्कर मारेल. कारण कोल्हापूरचा रस्ता अजूनही बंद आहे. पुलावरून पाणी ओसरले आणि जाण्यासाठी मार्ग मिळाला तर जाईन. मी सकाळीच कोल्हापूरला जाणार होतो, असे अजित पवार म्हणाले (Ajit Pawar said I was going to Kolhapur in the morning)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी