35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्र'या' व्हिडीओत पुणे पोलीस नक्की करतात काय? सुषमा अंधारेंचा सवाल

‘या’ व्हिडीओत पुणे पोलीस नक्की करतात काय? सुषमा अंधारेंचा सवाल

शिवसेना (उबाठा) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) या त्यांच्या राजकीय व्यक्तव्यांमूळे कायम चर्चेत असतात. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीवर अनेक मुद्यांवरून त्या टीकाटिपण्णी करत असतात. अश्यातच, त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ (Pune Police Viral Video) शेयर करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. सदर व्हीडियोमध्ये पोलिसांची व्हॅन दिसत असून काही लोक त्या व्हॅनमध्ये काही पाकिटे देत असल्याचे दिसत आहे. सुषमा अंधारे यांनी हा व्हीडियो ट्विटरवर शेयर करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग देखील केले आहे. यावेळी त्यांनी, ‘उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली.. पुन्हा एकदा गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली..’ अश्या शब्दात टीका केली आहे.

सुषमा अंधारे यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून (पूर्वीचे ट्विटर) हा व्हीडियो शेयर केला. 45 सेकंद लांबीचा हा व्हीडियो पुण्यातील जेल रोड येथील असल्याचे समजले आहे. या व्हीडियोमध्ये एक पोलिस व्हॅन एका कमी रहदारीच्या रस्त्यावर थांबलेली दिसत आहे. त्यात काही लोक हे व्हॅनमधील पोलिस कर्मचारी अथवा कैद्यांना कसलीतरी पाकिटे देत असल्याचे स्पष्ट होत आहे. हा व्हीडियो ट्विटर वर पोस्ट करत सुषमा अंधारे म्हणाल्या की, “उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली.. पुन्हा एकदा गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली.. कसली सुरक्षा, कसला बंदोबस्त? आधी पोलिसांशी हितगुज की देवघेव? मग हळूच निर्जन स्थळी कैद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकीट पुरवली जात आहेत?”


या व्हीडियोनंतर राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून हा नक्की काय प्रकार आहे? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. आधीच ललित पाटील प्रकरणामुळे पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशयाची सुई असताना त्यात आता हा नवा व्हीडियो समोर आल्याने संशयाला अधिक धार आली आहे.

त्यातच, सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा निशाणा साधत, ‘गृहमंत्री गृहखाते सांभाळण्यास अपयशी ठरले असून जमात नसेल तर राज्याचं गृहखातं माझ्याकडे द्या,’ असे व्यक्तव्य केले आहे.

हे ही वाचा 

आदित्य ठाकरेंच्या ट्विटचा सरकारने घेतला धसका !

मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी पुन्हा महाराष्ट्र दौरा !

सुनील तटकरेंनी जितेंद्र आव्हाडांना दिला दम

हा व्हीडियो वायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यात त्यांनी हा व्हीडियो जुना असल्याचे सांगत एकप्रकारे व्हीडियोमधील घटनेला दुजोराही दिला आहे. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललित पाटील प्रकरणातील हा व्हीडियो असून त्यात दिसणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले गेले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील या व्हीडियोवर प्रतिक्रिया आली आहे. फडणवीस यांनी ‘या विषयात झालेल्या तपासात विरोधकांची तोंडं बंद झाले असून, कुणीही तक्रार केली तरी त्यातली तथ्य पाहून योग्य ती कारवाई होईल,’ असे स्पष्ट केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी