31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रAnil Deshmukh : वाधवान कुटुंबियांचा कॉरन्टाईन कालावधी संपला, आज त्यांना सीबीआयकडे सोपवणार

Anil Deshmukh : वाधवान कुटुंबियांचा कॉरन्टाईन कालावधी संपला, आज त्यांना सीबीआयकडे सोपवणार

टीम लय भारी

मुंबई : वाधवान कुटुंबियांचा 14 दिवसांचा कॉरन्टाईन कालावधी आज दुपारी 2 वाजता संपत आहे. त्यामुळे त्यांना घेऊन जाण्याबाबत सीबीआय व ईडीला कळविले आहे. सीबीआयने त्यांना ताब्यात घेईपर्यंत आम्ही वाधवान कुटुंबियांना कुठेही सोडणार नाही, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी दिली.

Coronavirus

पालघरच्या घटनेत 101 आरोपींना अटक झाली आहे. यांत एकही मुस्लीम बांधव नाही. ‘होय बस’ असे एकजण ओरडत आहे, त्याचा शोएब असा अर्थ काढून काहीजणांनी जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला असेही देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी सांगितले. देशमुख यांनी आज फेसबुकवरून लोकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वाधवान व पालघर प्रकरणाबद्दल महत्वाची माहिती दिली.

देशमुख ( Anil Deshmukh ) पुढे म्हणाले की, आमच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या चुकीमुळे वाधवान कुटुंबियांना महाबळेश्वरला जाण्याची परवानगी मिळाली होती. त्यानंतर वाधवान यांची ही परवानगी रद्द करण्यात आली. त्यांना त्यावेळी कॉरन्टाईन केले होते. या कॉरन्टाईनचा कालावधी आज दुपारी 2 वाजता संपणार आहे. याची माहिती आम्ही सीबीआय व ईडीला दिली आहे.

दुपारी दोन पर्यंत सीबीआयचे अधिकारी वाधवान कुटुंबियांना घेऊन जातील, अशी अपेक्षा आहे. त्यांना जोपर्यंत नेले जाणार नाही तोपर्यंत ते आमच्याच ताब्यात असतील. मधल्या काळात काहीजण लंडनला पळाले. ह्यांना आम्ही कुठेही पळून जाऊ देणार नाही, अशा शब्दांत विजय मल्या याचे नाव न घेता देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी भाजपवर निशाणा साधला.

पालघरच्या घटनेला जातीय रंग दिला. त्याचे राजकारण केल्याचे सांगत देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी नाराजी व्यक्त केली. पालघरची घटना दुर्दैवी होती. त्यात तीन जणांची हत्या झाली. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. हा आदिवासी व दुर्गम परिसर आहे. या परिसरात वेषांतर करून चोर रात्रीचे येतात व मुलांना पळवून नेतात अशी अफवा पसरली होती. या गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे ते म्हणाले.

या घटनेची चौकशी सीआयडीमार्फत सुरू आहे. स्पेशल आयजी ही चौकशी करीत आहेत. परंतु या घटनेनंतर आठ तासांच्या आत पोलिसांनी 101 लोकांना ताब्यात घेतले. आरोपी बाजूच्या जंगलात गेले होते. तेथून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या 101 लोकांची यादी मी ( Anil Deshmukh ) जाहीर करीत आहे, व या 101 लोकांमध्ये एक सुद्धा मुस्लीम बांधव नव्हता. काही आरोपी ‘होय बस’ असे आवाज देत होते. पण या ‘होय बस’चा विपर्यास शोएब असा करण्यात आला. त्याला जातीय रंग देण्यात आला. जातीचा रंग देत राजकारणही करण्यात आले.

आज संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी लढाई करीत आहेत. परंतु काही मंडळींनी जातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला हे दुर्दैवी आहे. ‘कोरोना’च्या कठीण परिस्थितीत सुद्धा काहीजण ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहण्याचे प्रयत्न करीत आहेत असा टोला देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी भाजप नेत्यांचे नाव न घेता लगावला.

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

राहूल गांधी जे म्हणाले, तेच WHO ने सांगितले

Coronavirus : गृहमंत्री अनिल देशमुखांची तंबी, ‘सोशल मीडियाचा गैरवापर कराल तर याद राखा’

Wadhwan : अमिताभ गुप्तांचा कार्यभार श्रीकांत सिंह यांच्याकडे, मनोज सौनिक करणार गुप्तांच्या पत्राची चौकशी

वधावन परिवार के लॉकडाउन तोड़ने पर गृहमंत्री देशमुख ने

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी