34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई मेट्रो सेवा पहिल्याच दिवशी फेल , मुंबईकरांचा जीव धोक्यात : आशिष...

मुंबई मेट्रो सेवा पहिल्याच दिवशी फेल , मुंबईकरांचा जीव धोक्यात : आशिष शेलार

टीम लय भारी 

मुंबई :गुढीपाडव्याच्या औचित्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्ते ‘मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A’या मार्गाचे लोकापर्ण केले.यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून राज्य सरकार लोकांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे म्हणत भाजपला टोला लगावला . मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी टीका करत मुंबई मेट्रोचे पहिल्या दिवशीच ऑपरेशन फेल झाल्याचे सांगितले आहे. तसेच शेलारांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. (Ashish Shelar Slams Thackeray Sarkar)

मुंबई मेट्रोचे पहिल्या दिवशीचे ऑपरेशन अयशस्वी ठरले आहे. मेट्रो ट्रेन वाहतूक विलंब, कधी मेट्रो ट्रेनच रद्द, तर कधी सॉफ्टवेअर समस्या दिसून आल्या आहेत, योग्यरीत्या तपास न करता मुंबई मेट्रो सुरू करण्यात आली आहे, या मेट्रोचे अजून 15 दिवस काम बाकी असूनही ठाकरे सरकारने याच्या उद्घाटनाचा शुभारंभ केला. खोट्या पीआरसाठी मुंबईकरांचा जीव धोक्यात घालू नका, असे ट्वीट करत आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.


हे सुद्धा वाचा : 

25 वर्षे झाले मुंबईकर भोगतायत…भाजप नेते आशिष शेलारांची माविआ सरकारवर टिका

गिरीश महाजनांची सभागृहात डुलकी, मग आशिष शेलारांनी काय केले बघा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी