29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रअखेर ईडीची संजय राऊतांच्या घरी धाड, मुंबई आणि अलिबागमधील मालमत्ता जप्त

अखेर ईडीची संजय राऊतांच्या घरी धाड, मुंबई आणि अलिबागमधील मालमत्ता जप्त

टीम लय भारी 

मुंबई:  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. ईडीने संजय राऊत यांच्या मुंबई आणि अलिबागमधील मालमत्तात जप्त केल्या आहेत. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याचे समजते. ED raids Sanjay Raut house and confiscated property

पत्राचाळ घोटाळ्यातील पैसे हे अलिबाग येथील जमीन खरेदीसाठी वापरली म्हणून ही कारवाई केली असून, श्रीधर पाटणकर यांच्यानंतर शिवसेनेच्या मोठ्या नेत्यावर ईडीने ही कारवाई केली आहे. मनी लाँड्रिंगमधील पैशातून संपत्ती खरेदी केल्याची माहिती ईडीनं दिलीय.

महाविकास आघाडीचे अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. या आधीही संजय राऊत यांनी ईडीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले होते. केंद्रात सत्ता असलेलं भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन बिगर भाजपशासित राज्यांमधील इतर पक्षांच्या नेत्यांना त्रास देत असल्याचा आरोप महाराष्ट्रातील नेत्यांकडून केला जात होता. ED raids Sanjay Raut house and confiscated property

यामध्ये प्रामुख्यानं एक नाव आघाडीवर होतं, ते म्हणजे संजय राऊत. संजय राऊतांनी भाजप नेत्यांसोबतच थेट ईडी अधिकारी खंडणी रॅकेट चालवत असल्याचा घणाघाती आरोप केला होता. संजय राऊत यांनी या सर्व कारवाईवर ट्ववि्ट कर असत्यमेव जयते असं म्हटलं आहे.

 

हे सुध्दा वाचा: 

ED का बड़ा एक्शन, सत्येंद्र जैन के परिवार और संजय राउत की पत्नी की करोड़ों की संपत्ति अटैच

लफंगेगिरीला हिंदूत्त्ववादामध्ये स्थान नाही, संजय राऊत यांचा भाजपला टोला

दिघी पोर्ट आणि जेएनपीटी पोर्टमधून स्थानिकांना रोजगार मिळणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी