34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रAtmaNirbhar Bharat Pacakge : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी केल्या महत्त्वाच्या...

AtmaNirbhar Bharat Pacakge : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी केल्या महत्त्वाच्या घोषणा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM MODI) यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजबद्दलची (AtmaNirbhar Bharat Pacakge) माहिती देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी सीतारामन यांनी शिक्षण क्षेत्रातील भरीव उपाय योजनाबद्दल सांगितले. तसेच त्यांनी गरिब, गरजू आणि जनधन योजनेसह उज्वला योजनेअंतर्गत नागरिकांना कोणत्या सुविधा देण्यात आल्या आहेत, याचीही माहिती दिली.

मागील ३ टप्पांमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक, स्थलांतरित मजूर, वीज कंपन्या, स्थावर मालमत्ता, वित्त संस्था, कृषी, कोळसा, खनिज आणि संरक्षण क्षेत्रासंदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. MSME सेक्टर, पगारदार वर्ग, शेतकरी, श्रमिक, स्थलांतरीत मजूर यांच्यासाठीही मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर एअरस्पेस मॅनेजमेंट, MRO, अवकाश संशोधन क्षेत्र आणि अणू ऊर्जा या क्षेत्रांसाठी विशेष घोषणा करण्यात आल्या.

डीटीएचवर प्रत्येक इयत्तेसाठी वेगळा चॅनेल तयार करणार आहेत. सध्या असे तीन चॅनल असून यामध्ये आणखी १२ चॅनलची भर पडणार आहे. ज्या विद्यार्थांकडे इंटरनेटच्या सुविधेचा अभाव असेल त्यांच्यासाठी हे फायदाचे होईल, असे त्या म्हणाल्या.

चॅनलद्वारे ई-कॉन्टेंटची निर्मितीही होईल. वन क्लास, वन चॅनल या योजनेद्वारे १२ वीपर्यंतच्या विद्यार्थांसाठी चॅनेल तयार केले जातील. पॉडकॉस्ट, कम्युनिटी रेडिओ या माध्यमाचा वापर करण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालकांच्या मानसिक आरोग्यासाठी मनोबल प्रोग्रामही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच दिव्यांगासाठी विशेष शिक्षा सामग्री तयार करण्यात येईल. देशातील टॉप १०० विद्यापीठांना ऑनलाइन शिक्षणाची परवानगी देण्यात आली आहे.

१६ हजार ३९४ कोटी गरिबांच्या खात्यात जमा

निर्मला सीतारामन यांनी २० लाख कोटी रूपयांच्या पॅकेजमधून गरिबांना दिल्या जाणा-या मदतीची माहिती यावेळी दिली. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि गरिबांवर उपाशीपोटी झोपण्याची वेळ येऊ नये म्हणून सरकारने मागील दोन महिन्यांच्या काळात अनेक उपाययोजना केल्या. गरिबांना, स्थलांतरित मजुरांना मदत देण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान गरीब योजनेतंर्गत ही मदत करण्यात आली. तंत्रज्ञानामुळे गरिबांना तातडीने थेट मदत करता आली. आतापर्यत जनधन खात्यात १० लाख २२५ कोटी रुपये जमा करण्यात आले. विविध योजनातंर्गत १६ हजार ३९४ कोटींची मदत जमा करण्यात आली आहे. त्याचबरोबर २५ कोटी गरीब, मजुरांना गहु, तांदूळ मोफत वाटप करण्यात आले, अशी माहिती सीतारामन यांनी दिली.

स्थलांतर करणा-या मजुरांची काळजीही सरकारकडून घेण्यात आली. या मजुरांना घरी जाण्यासाठी सरकारने रेल्वे सेवा सुरू केली. त्याचबरोबर त्यांच्या भाड्याच्या ८५ टक्के खर्च केंद्राने उचलला आहे. प्रवासादरम्यान त्यांच्या जेवणाची व्यवस्था सरकारने केली आहे. अन्न धान्य दिल्यानंतर त्यासाठी उज्ज्वला गॅसयोजनेतंर्गत मोफत सिलेंडर देण्यात आले, असे सीतारामन म्हणाल्या.

मनरेगासाठी अतिरिक्त ४० हजार कोटी देणार

आत्मनिर्भर देशासाठीचा निर्धार सिद्धीला नेण्यासाठी भूमी, मजूर, तरलता आणि कायदा यावर आत्मनिर्भर भारत पॅकेजमध्ये भर देण्यात येत आहे. हे संकट आणि आव्हान म्हणजे आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी संधी आहे. एक देश म्हणून आपण एका अतिशय महत्वाच्या वळणावर उभे आहोत. हे एवढे मोठे संकट भारतासाठी एक इशारा आहे, तो संदेश आणि संधी घेऊन आला आहे, असे निर्मला सीतारामन यांनी आजच्या पत्रकार परिषदेत म्हटले.

२० कोटी जनधन खात्यात १० हजार २५ कोटी जमा केले आहेत तर ८.१९ कोटी शेतक-यांच्या थेट खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये दिलेत. त्याचसोबत १४०५ कोटी रुपये ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येत आहेत. गरीबांना जेवण दिले जात आहे. तसेच कॅम्पमध्ये राहणा-या लोकांनाही मदत केली जात आहे. २.२ कोटी बांधकाम मजुरांसाठी ३ हजार ९५० कोटी देण्यात आले आहेत. ६.८१ कोटी जनतेला उज्ज्वला योजनेतून मोफत गॅस सिलेंडर दिलेत. १२ लाख ईपीएफओ धारकांना आगाऊ रक्कम ऑनलाइन काढता आली असे त्या म्हणाल्या.

श्रमिक विशेष गाड्या सुरू केल्या

राज्यात अडकलेल्या कामगारांना त्यांच्या जिल्ह्यात, राज्यात पोहचवण्यासाठी श्रमिक विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या. मजुरांना स्थानकांवर आणण्याची विनंती राज्यांना करण्यात आली. केंद्र सरकारने ८५ टक्के खर्च उचलला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत लोकांना थेट लाभ हस्तांतरण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला, गेल्या काही वर्षांतील उपक्रमामुळे आम्हाला हे करणे शक्य झाले आहे.

आरोग्य कर्मचा-यांना ५० लाखांचे विमा कवच

कोरोना संकटकाळात १५ हजार कोटींची मदत देण्यात आली आहे. राज्यांना ४ हजार ११३ कोटी रुपये तर आरोग्य कर्मचा-यांना ५० लाखांचे विमा कवच पुरवण्यात आले आहे. प्रवासी मजुरांना घरी पोहचल्यानंतर काम देण्यात येईल. आज ७ उपाय करणार आहोत. यात मनरेगा, ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य – शिक्षण, व्यवसाय आणि कोरोना, कंपन्यांचा अधिनियमितकरण, व्यवसाय सुलभ करणे, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, राज्य सरकारची स्त्रोत यांचा समावेश आहे. शिक्षकांचे LIVE वर्ग चॅनेलवर दाखवणार आहोत, टाटास्काय व एअरटेलही शैक्षणिक व्हिडीओ दाखवतील, ई-पाठशालांतर्गत २०० नवी पुस्तके आणली. विद्यार्थ्यांसाठी १२ ऑनलाइन चॅनेल सुरु करणार आहोत अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली.

रोजगारास चालना देण्यासाठी आता सरकार मनरेगासाठी अतिरिक्त ४० हजार कोटी रुपये देईल असेही त्यांनी सांगितले. तसेच सर्व जिल्ह्यांत संसर्गजन्य रोगांचे कक्ष, प्रत्येक तालुक्यात पब्लिक हेल्थ लॅब उभारणार आहे, आरोग्य क्षेत्रासाठी जादा खर्च करणार, ग्रामीण व शहरी भागात आरोग्य सुविधा वाढवण्यावर सरकारचा भर असेल असे निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी