28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
HomeराजकीयNilesh Rane : 'कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा शिल्लक राहिली...

Nilesh Rane : ‘कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा शिल्लक राहिली आहे का’ : नीलेश राणे

टीम लय भारी

मुंबई : माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. विधान परिषदेच्या रणसंग्रामामध्ये अखेर सत्ताधारी महाविकास आघाडीने विजयाचा झेंडा फडकावून, पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी ठाकरे सरकारच्या बाजूने कौल दिला. राज्यातील सहापैकी चार जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले असून, भाजपचे बालेकिल्ले ढासळले आहेत. त्याचवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘हा निकाल म्हणजे वाचाळवीरांना चपराक’ अशी प्रतिक्रिया दिली होती.

ट्विट करत नीलेश राणे म्हणाले, “वाह अजितदादा वाह!! ज्यांना चपराक बसली म्हणताय, त्यांच्याबरोबर एक वर्षापूर्वी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ तुम्ही घेतली होती हे विसरलात का? कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा शिल्लक राहिली आहे का,” अशा शब्दांत राणे यांनी अजित पवारांचा खरपूस समाचार घेतला आहे.

काय म्हटले होते अजित पवारांनी?

नागपूर आणि पुण्यात ब-याच वर्षांपासून पदवीधर मतदारसंघामध्ये एका पक्षाची मक्तेदारी होती. मात्र, सुशिक्षित पदवीधर, शिक्षक मतदार महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे हे सिद्ध झालं. बरेच जण वाचाळ बडबड करत होते. मी त्यांची नावे घेऊन कारण नसताना वेळ घालवू इच्छित नाही. पण हा निकाल म्हणजे त्या वाचाळवीरांना ही फार जबरदस्त चपराक बसलेली आहे. आता लोकांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय हे या निकालावरून स्पष्ट झाले आहे, असे अजित पवार म्हणाले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी