महाराष्ट्र

श्याम मानव म्हणाले, धिरेंद्र महाराजांमुळे देशाचे नाव जगात होईल!

धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार महाराजांना (Dhirendra Shastri) भक्तांचे नाव, वय, दूरध्वनी क्रमांक. त्यांच्या वडिलांचे नाव अंतर्ज्ञानाने समजते… इतकेच नव्हे, तर भक्तांच्या घरातील कोणत्या अलमारीत कोणत्या वस्तू ठेवल्या आहेत हेदेखील दिसते… पण जगात आजपर्यंत कधीच सिद्ध न झालेली ही ‘टेलीपथी’ विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध झाल्यास भारताला त्याचा फायदाच होईल. धीरेंद्र महाराजांमुळे जगात देशाचे नाव होईल, अशी उपरोधिक टीका भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि संस्थापक श्याम मानव यांनी केली आहे. (Because of Dhirendra Maharaj, the world will praise India) श्याम मानव म्हणाले, “आम्ही जे आव्हान दिले आहे ते वैज्ञानिक कसोट्यांवर पार पाडलं जाणे आवश्यक आहे. ही ‘टेलीपथी’, अंतर्ज्ञान आजपर्यंत जगात कधीच सिद्ध झालेली नाही. वैज्ञानिक कसोट्यांवर जर का ही ‘टेलीपथी’ सिद्ध झाली तर माझ्यासारख्या भारतीय माणसाला ती अभिनास्पद गोष्ट ठरेल. कारण त्यामुळे भारताचे संपूर्ण जगात नाव होणार आहे. देशाच्या सुरक्षेसाठीदेखील त्याचा फायदा होणार आहे.” (Shaym Manav)

श्याम मानव म्हणाले, धीरेंद्र महाराजांची दिव्यशक्ती सिद्ध व्हावी यासाठीच महाराजांपर्यंत इतर कोणत्याही मार्गाने माहिती पोहोचणार नाही याची काळजी मला घ्यावी लागेल. आम्ही अचानक त्यांच्यासमोर दहा माणसे उभी करू त्या माणसांना पाहून धीरेंद्र महाराजांनी त्यांचे नाव, वय, वडिलांचे नाव आणि त्यांचा भ्रमणध्वनी (मोबाईल) क्रमांक सांगायचा आहे. आणि बाजूच्या खोलीत दहा वस्तू ठेवू, महाराजांनी त्या वस्तू कोणत्या हे ओळखायचे आहे. पत्रकार भवनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. या सर्व घटनांचे चित्रीकरण होत राहील आणि ही प्रक्रिया दोनदा पार पाडली जाईल.

हे सुद्धा वाचा 

VIDEO : मीडियाची प्रतिष्ठा धुळीस मिळविणारे एबीपी न्यूजच्या या पत्रकाराचे ‘हे’ काम पाहा …

परदेश नव्हे; हे तर आपले विरार : नितीन गडकरींनी शेअर केले दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचे फोटो; 12 तासात प्रवास सुसाट!

द मोदी क्वेश्चन : आयटी कायदा आणीबाणीतील अधिकार वापरुन केंद्राने बीबीसी डॉक्युमेंटरी केली ब्लॉक

… तर धीरेंद्र महाराजांच्या पायांवर डोके ठेवीन !
सामान्य माणसाच्या हातून चुका होऊ शकतात. दिव्य शक्ती १०० टक्के खरी ठरते. दिव्य शक्तीच्या हातून चुका होणे शक्य नाही. तरीही आम्ही ९० टक्क्यांची अपेक्षा बाळगतो. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ९० टक्के जरी खऱ्या ठरल्या तरी आम्ही हे कबुल करू की धीरंद्र महाराजांकडे खरोखरच दिव्य शक्ती आहे. आणि त्यांनतर आम्ही आमच्या समितीचे ३० लाख रुपयांचे पारितोषिक देऊ. मी श्याम मानव अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा संस्थापक धीरेंद्र महाराजांच्या पायांवर डोके ठेवीन. त्यांची माफी मागेन. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती मागील ४० वर्षे काम करीत आहे. हजारो बाबांचा, मांत्रिकांचा, देवी-देवता शरीरात आणणाऱ्या लोकांचा आणि ज्योतिषांचे पितळ उघडे पडले आहे. तसेच नागपूरला ‘पोलखोल शहर’ अशी प्रसिद्धी मिळवून दिलेली आहे. ती अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती कायमची बंद करू आणि तुमची जाहीरपणे माफीही मागू,असे श्याम मानव म्हणाले.

कोणाच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही
श्याम मानवांनी केलेल्या टीकेबाबत धीरेंद्र महाराजांना विचारले असता ते म्हणाले, “आमच्या गुरूंकडून आम्हाला याबाबतचे प्रमाणपत्र मिळाले आहे. आम्ही चमत्कारी पुरुष आहोत हे आम्हाला जगाला सिद्ध करून दाखवण्याची गरज भासत नाही.” भारतात अशी कित्येक झपाटलेली ठिकाणे आहेत, ‘आयएसआय’मार्कची ठिकाणे आहेत. ज्या ठिकाणी नकारत्मक शक्तींचा वावर आहे. त्याला लोकं भूतप्रेत म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला नकारात्मक शक्ती म्हणतात. शरीरातील कंपनांच्याबाबत म्हणायचे झाल्यास लोकांमधील नकारत्मक ऊर्जा असते तीच शरीरातील कंपने असतात. आणि केवळ भारतातच नव्हे तर ब्रिटनमध्येही असे दरबार भारतात आणि त्या दरबारात भूते आली, असा दावाही धीरेंद्र महाराजांनी केला आहे.

जादूटोण्याच्या संशयावरून हजारो माणसांचा बळी जातो…
त्यांच्या दाव्यांनुसार दिव्य दरबारात ते भूतप्रेत दाखवितात. अमुक अमुक व्यक्तीच्या अंगात भूतप्रेत आले आहे, याच्यावर जादूटोणा केलेला आहे, याच्यावर करणी केली आहे, याच्यवर अमुक एका व्यक्तीने तोटका केलेला आहे, अशाप्रकारचे दावे करणे हा जादूटोण्याविरोधी कायद्यानुसार महाराष्ट्रात गंभीर अपराध आहे, असल्याचे श्याम मानव म्हणाले. अमुक एकाने तुझ्यावर जादूटोणा केवळ असे सांगितल्यानंतर जादूटोण्याच्या केवळ संशयापायी हजारो माणसे मारली जातात. त्यासाठीच हा कायदा तयार करण्यात आला आल्याचे सांगत श्याम मानव यांनी त्यावर आक्षेप नोंदविला आहे.

टीम लय भारी

Recent Posts

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

6 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

7 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

7 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

7 hours ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

13 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

14 hours ago