30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रभाजप – राष्ट्रवादीकडून मतदारांची थट्टा, पदवीधर मतदारसंघासाठी कारखानदारांना उमेदवारी

भाजप – राष्ट्रवादीकडून मतदारांची थट्टा, पदवीधर मतदारसंघासाठी कारखानदारांना उमेदवारी

टीम लय भारी

मुंबई : निवडणूक लढविण्याचे पेंटट हे अट्टल राजकारणी व धनदांडगे भांडवलदार यांच्याकडेच आहे, असे अलिखीत धोरण राजकीय पक्षांनी बनविलेले दिसते. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने या समाजविघातक धोरणाची प्रचिती आणून दिली आहे ( BJP and NCP has given ticket to wrong candidates ).

किमान पदवीधर मतदारसंघासाठी तरी तरूण, होतकरू, अभ्यासक, संशोधक, सामाजिक कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याची आवश्यकता आहे. पण उच्च शिक्षणाशी निगडीत असलेल्या या मतदारसंघातही भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने कारखानदार व अट्टल राजकारण्यांना उमेदवारी दिली आहे ( BJP and NCP has given ticket to politicians in Pune graduate constituency ).

संग्राम देशमुख व अरूण लाड हे दोन्ही उमेदवार अनुक्रमे भाजप व राष्ट्रवादीकडून पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरले आहेत. युवक व पदवीधरांशी यांचा दुरान्वये सुद्धा संबंध नाही. केवळ राजकीय सोय म्हणून त्यांना ही उमेदवारी दिल्याचे दिसत आहे ( Sangram Deshmukh and Arun Lad has get ticket for political reason ).

हे सुद्धा वाचा

औरंगाबाद, पुण्याच्या पदवीधर निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवार जाहीर

Balasaheb Thorat : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रच लढणार- बाळासाहेब थोरात

Anvay Naik suicide case : किरीट सोमय्या, राम कदम आणि अमृता फडणवीस यांच्या टीकेला निलम गो-हे यांचे चोख उत्तर

अरूण लाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष आहेत. सांगलीमधील क्रांती साखर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत. संग्राम देशमुख हे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. सांगली जिल्हा परिषदेचे ते यापूर्वी अध्यक्ष होते. सातारा जिल्ह्यातील ग्रीन शुगर या साखर कारखान्याचे ते संस्थापक आहेत. त्यांना पलूस – कडेगाव या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवायची होती. पण महायुतीत भाजपच्या वाट्याला तो मतदारसंघ आला नव्हता. त्यामुळे त्यावेळी त्यांची संधी हुकली होती. म्हणून त्यांना आता विधानपरिषदेसाठी संधी दिल्याचा आरोप या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार गणेश काटकर यांनी केला आहे.

पदवीधरांचे अनेक प्रश्न आहेत. देशमुख – लाड जोडगोळीला या प्रश्नांचा थोडा तरी अभ्यास आहे का, असा सवाल काटकर यांनी केला आहे.

पदवी शिक्षण प्राप्त केल्यानंतर तरूणांना नोकरी किंवा रोजगार मिळत नाही. बेरोजगारांची संख्या मोठी आहे. पदव्युत्तर, पीएच.डी, एम.फील. शिक्षणाविषयी पुणे शहर वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये बिकट स्थिती आहे. संशोधन, इनोव्हेशन, पेटंट हे उच्च शिक्षणातील महत्वाचे घटक आहेत. पण या क्षेत्रात लाड – देशमुख यांनी थोडे तरी काम केले आहे का ? असाही सवाल काटकर यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील – प्रकाश जावडेकरांनी पदवीधरांसाठी काय केले ?

पुणे पदवीधर मतदारसंघातून चंद्रकांत पाटील व प्रकाश जावडेकर हे दोघेजण प्रत्येकी बारा वर्षे आमदार म्हणून कार्यरत होते. हे दोघेही राजकारणात मोठे झाले. मंत्री झाले. अमाप बलदंड झाले. पण दोघांनीही पदवीधरांच्या प्रश्नाबद्दल कधीही तोंड उघडले नाही. पदवीधरांसाठी या दोघांनी काहीही काम केलेले नाहीत, असाही आरोप गणेश काटकर यांनी केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी