35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रअमरावतीत बंदला हिंसक वळण; आक्रमक आंदोलकांची दगडफेक आणि तोडफोड,पोलिसां लाठीचार्ज!

अमरावतीत बंदला हिंसक वळण; आक्रमक आंदोलकांची दगडफेक आणि तोडफोड,पोलिसां लाठीचार्ज!

टीम लय भारी

अमरावती: अमरावतीत भाजपानं बंदचं आवाहन केलं. यानंतर आज (१३ नोव्हेंबर) पाळण्यात येत असलेल्या बंदला हिंसक वळण लागलं. आक्रमक आंदोलकांनी या दुकानांवर दगडफेक करत तोडफोड केली. यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात तरुणांचा सहभाग आहे (BJP calls for bandh in Amravati).

अमरावतीत बंदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्य राखीव पोलीस दलही चौकाचौकात तैनात करण्यात आलं. मात्र, असं असतानाही समोर आलेल्या दृष्यांनुसार आंदोलक बंद दुकानांची कुलुपं तोडून तोडफोड करत असल्याचंही दिसत आहे. तसेच दुकानांबाहेरील साहित्याचंही नुकसान केलं जातंय. त्यामुळे आक्रमक आंदोलकांसमोर पोलीस यंत्रणा तोकडी पडत असल्याचं चित्र आहे. नागपूरचे पोलीस महासंचालक संदीप पाटील हे अमरावतीत दाखल झाले आहेत. त्यांनी या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

रझा अकादमी हे भाजपचं पिल्लू, त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याचे काय कारण? संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

कंगणा राणावत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा !: नसिम खान

नेमकं प्रकरण काय?

त्रिपुरा राज्यात झालेल्या अत्याचारा विरोधात अमरावतीत १२ नोव्हेंबर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर 15 ते 20 हजार लोकांनी निषेध मोर्चा काढला होता. मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागले. यात अमरावती शहरातील २० ते २२ दुकानात तोडफोड झाली. काही दुकानादारांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता तर कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न देखील निर्माण झाला. या मोर्चा विरोधात भाजपाने अमरावती शहर बंदचे आवाहन केलं. मात्र, या बंद दरम्यान आंदोलकांनी हिंसा केली.

लोकमान्य टिळकांचं ‘ते’ वाक्य कंगनाला तंतोतंत लागू पडतं; शिवसेनेचा टोला

Violence in parts of Maharashtra during protest rallies, home minister calls for peace

यावर अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जनतेला शांततेच आवाहन केलं आहे. “कोणीही सामान्य जनतेला वेठीस धरू नये. अमरावतीच्या घटनेची सखोल चौकशी होईल. याला कोणीही राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये. सर्वांनी शांतता राखावी,” असं आवाहन अमरावतीच्या पालकमंत्री व महिला, बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी