महाराष्ट्र

Blood Donation Camp : लग्नघाईत रक्तदानाचा मुहूर्त

रक्ताचा तुडवडा भासू नये म्हणून बऱ्याचदा विविध संस्थांमार्फत, राजकीय पक्षांतर्गत किंवा आरोग्य सेवेअंतर्गत रक्तदान शिबिराचे (blood donation) आयोजन करण्यात येते. अनेक हौशी लोक यात सहभागी होतात, बऱ्याचदा आयोजनात सुद्धा सहभाग नोंदवतात, त्यामुळे ज्यांना रक्ताची गरज असते अशांसाठी हे ‘वरदान’ ठरते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने नवनाथ पवार या तरुणाने पुढाकार घेत चक्क लग्नाच्या मंडपात रक्तदान शिबिर आयोजित करून समाजापुढे एक अनोखा आदर्शच समोर ठेवला. त्यांची ही जगानिराळी देशभक्ती सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरू लागली आहे. नवनाथ पवार भारतीय सेनेमध्ये कार्यरत असून अमृत महोत्सवानिमित्त त्यांनी अनोख्या पद्धतीने देशप्रेम व्यक्त करीत लग्न सोहळा पार पाडला आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त भारतीय सेनेमध्ये कार्यरत असलेले नवनाथ पवार यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या लग्नसमारंभात विधींसोबत रक्तदान शिबिराचे (blood donation) आयोजन करण्यात आले होते, त्यामुळे उपस्थितांनी सुद्धा या अनोख्या जागृतीला पाठिंबा दर्शवत या शिबीरात सहभाग नोंदवला. नवनाथ हे शिवकार्यामध्ये अग्रेसर असणारी राजे शिवछत्रपती परिवार या संस्थेची सेवक आहेत. या परिवारातील अनेक पदाधिकाऱ्यांनी सुद्धा या लग्नाला विशेष उपस्थिती दर्शवत नवनाथ यांच्या उपक्रमाला प्रतिसाद दिला.

हे सुद्धा वाचा…

Azadi ka Amrit Mahotsav : ग्रीनफन फाऊंडेशनकडून वृक्षारोपण, कृष्णा चतुर्वेदी यांची उपस्थिती

मुंबई अग्निशमन अधिकारी आणि जवानांना राष्ट्रपतींचे अग्निशमन सेवा पदके

Dahi Handi 2022 : ‘दहीहंडी’चा खेळात समावेश, मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवनाथ पवार हे पुणे येथील रहिवासी आहेत, जे भारतीय लष्करामध्ये आपली देश सेवा बजावत आहेत. देशप्रमाने भारून गेलेल्या नवनाथ यांचे जेव्हा लग्न ठरले तेव्हा ते अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले. यंदाच्या 15 ऑगस्टला संपुर्ण देशभरातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला, त्याचेच निमित्त साधून या पती – पत्नीच्या जोडीने आपल्या भव्य लग्न कार्यात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले. अनोख्या पद्धतीच्या या विधीला प्रतिसाद देत वधू – वर यांच्यासह वऱ्हाडी मंडळींनी सुद्धा रक्तदान केले आणि या उपक्रमाचे कौतुक करत दोघा उभयतांना भरभरून आशिर्वाद सुद्धा दिला.

या रक्तदान शिबीरासाठी हर्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचे सहकार्य मिळाले. यावेळी बोतलाना हर्ष फाउंडेशनचे अध्यक्ष अप्पा घोरपडे म्हणाले, लग्नकार्यामध्ये रक्तदान शिबिर घेऊन एक आदर्श निर्माण केलेला आहे.रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे असे म्हणत उपस्थितींना सुंदर संदेश दिला. लग्नघाईत रक्तदानाचा मुहूर्त लागल्याने आता सध्या यावर सगळीकडून चर्चा होऊ लागली आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

2 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

3 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

3 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

3 hours ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

9 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

10 hours ago