30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई अग्निशमन अधिकारी आणि जवानांना राष्ट्रपतींचे अग्निशमन सेवा पदके

मुंबई अग्निशमन अधिकारी आणि जवानांना राष्ट्रपतींचे अग्निशमन सेवा पदके

आपल्या प्राणांची पर्वा न करता दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल व कुशल कामगिरीकरिता भारताच्या राष्ट्रपती यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात मुंबई अग्निशमन अधिकारी व जवानांना अग्निशमन सेवा (Fire Service) पदक घोषित करून गौरविले आहे. यामध्ये शौर्य पदक आणि गुवत्तापूर्ण सेवा पदकांचा समावेश आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालय येथे ०७ ऑगस्ट २०२१ रोजी तेथील स्थापित दहा मेट्रिक टन क्षमतेच्या एल. पी. गॅसच्या टाकीतून झालेल्या वायूगळतीमुळे उद्वभवलेली अभूतपूर्व परिस्थिती हाताळताना आपल्या प्राणांची पर्वा न करता दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल व कुशल कामगिरी करिता मुंबई अग्निशमन अधिकारी आणि जवानांना भारताचे राष्ट्रपती यांनी अग्निशमन शौर्य पदक घोषित करण्यात आले आहे.
यामध्ये किशोर ज्ञानदेव घाडीगावकर (विभागीय अग्निशमन अधिकारी), विशाल चंद्रकांत विश्वासराव (वरीष्ठ केंद्र अधिकारी), दीपक मधुकर जाधव (केंद्र अधिकारी), सागर जगन्नाथ खोपडे (केंद्र अधिकारी), संजय सदाशिव गायकवाड (प्रमुख अग्निशामक), संजय लक्ष्मण निकम (अग्निशामक), गणेश देवराम चौधरी (अग्निशामक) या अग्निशमनच्या अधिकारी आणि जवानांना अग्निशमन शौर्य पदकाने तर संपत बापूराव कराडे (विभागीय अग्निशमन अधिकारी), दत्तात्रय बंडू पाटील (प्रमुख अग्निशामक), संदीप रामचंद्र गवळी (यंत्रचालक), गुरुप्रसाद अनिल सावंत (सहाय्यक कार्यदेशक) या अग्निशमनच्या अधिकारी आणि जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी अग्निशमन सेवा पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी