महाराष्ट्र

धनगर आरक्षणावर १६ फेब्रुवारीला उच्च न्यायालयात सुनावणी

धनगर समाजाच्या आरक्षणावर (Dhangar reservation) सोमवारी उच्च न्यायायलयात (Bombay High Court) सुनावणी (hearing) पार पडली. यापूर्वी न्यायालयाने धनगर आरक्षणाविरोधात असलेल्या वनवासी कल्याण आश्रमाला स्वतंत्र याचिका दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर सोमवारी स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आली असून धनगर आरक्षणवावर आता १६ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. (Bombay High Court hearing on Dhangar reservation on February 16) दरम्यान धनगर समाजाला लवकरच त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळेल, असा दावा इंडिया अगेन्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी केला.

केंद्र तसेच राज्य सरकारने धनगर आरक्षणासंदर्भात न्यायालयात सादर केलेले उत्तर तसेच इंडिया अगेन्स्ट करप्शन, महाराष्ट्र अहिल्याबाई समाज प्रबोधिनी मंच तसेच वनवासी कल्याण आश्रमाच्या याचिकेवर एकत्रित सुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती हेमंत पाटील यांनी दिली. पाटील यांनी आतापर्यंत आरक्षणासंदर्भात २ हजार पुरावे न्यायालयात सादर केले आहेत. लवकरच धनगर समाज बांधवांना अनुसूचित जमातीचे दाखल मिळणार आहे. समाजाला आरक्षण मिळाले आहे, पंरतु त्याची अंमलबजावणीच होत नसल्याने समाजबांधव आरक्षणापासून वंचित असल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली.
राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागेल तसेच समाजाची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू होईल. तसेच ८% राजकीय आरक्षणामुळे राज्यात २०२४ च्या ​विधानसभा निवडणुकीत समाजाचे २० आमदार निवडून येवू शकतात, असा दावा हेमंत पाटील यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा
धनगर आरक्षणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे साकडे

धनगर आरक्षणावर न्यायालयात म्हणणे मांडण्यास ‘महाविकास आघाडी’ची टाळाटाळ ; जोरदार आंदोलनाची तयारी

Breaking : उदयनराजेंच्या भेटीला राम शिंदे, धनगर आरक्षणाबाबत करणार चर्चा

आंदोलनांना यश मिळेल, हेमंत पाटील यांचा दावा
धनगर आरक्षणासाठी राज्य सरकारविरोधात पाटील यांनी २५६ आंदोलने केली असून त्यांच्यावर आंदोलनासंदर्भात ९ गुन्हे दाखल आहेत. विधानभवनात ​तसेच मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर घुसून आंदोलन करण्याचा प्रयत्न देखील पाटील यांनी केला होता. आंदोलनामुळे सात वेळा त्यांना कारागृहात जावे लागले आहे. आता या आंदोलनाला यश मिळणार असल्याची भावना पाटील यांनी व्यक्त केली. राज्यातील धनगर समाजबांधवांसाठी आतापर्यंत केलेल्या आंदोलनांना यश मिळणार असून आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल, असे हेमंत पाटील म्हणाले.

निकाल धनगर समाजाच्या बाजूने लागण्याची शक्यता : हेमंत पाटील
आदिवासी समाजावर अन्याय होवू न देता धनगर बांधव त्यांच्या हक्काच्या आरक्षणाची मागणी करीत आहेत. अशात आदिवासी बांधवांकडून कितीही विरोध झाला तरी धनगर बांधवांच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. धनगर समाज खंबीरपणे पाठीशी उभा आहे, असा विश्वास हेमंत पाटील यांनी व्यक्त केला.

प्रदीप माळी

Recent Posts

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

23 mins ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत       (wealth) पाच…

39 mins ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

59 mins ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

1 hour ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

7 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

8 hours ago