33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
HomeराजकीयBreaking : उदयनराजेंच्या भेटीला राम शिंदे, धनगर आरक्षणाबाबत करणार चर्चा

Breaking : उदयनराजेंच्या भेटीला राम शिंदे, धनगर आरक्षणाबाबत करणार चर्चा

टीम लय भारी

मुंबई : खासदार उदयनराजे यांनी मराठा आररक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. आता तसाच पुढाकार धनगर आरक्षणसाठीही घ्यावा अशी विनंती करण्यासाठी माजी मंत्री व भाजपचे उपाध्यक्ष राम शिंदे उदयनराजे यांना भेटणार आहेत ( Ram Shinde going to meet Udayanraje ).

आज ( शनिवारी ) दुपारी ३ वाजता राम शिंदे यांची खासदार उदयनराजे यांच्यासोबत भेट निश्चित झाली आहे. या भेटीमध्ये राम शिंदे हे उदयनराजेंसोबत धनगर आरक्षणासंबंधी चर्चा करतील असे सूत्रांनी सांगितले ( Ram Shinde will discuss with Udayanraje on Dhangar reservation issue ).

हे सुद्धा वाचा

Dhangar Reservation : धनगर आरक्षणातही दोन्ही ‘छत्रपतीं’नी लक्ष घालावे!

धनगर आरक्षण कृती समितीचा ठराव : ठाकरे सरकारने केंद्राला आरक्षणाची शिफारस करावी, मोदी सरकारने ते अंमलात आणावे

गोपीचंद पडळकरांनी धनगर आंदोलन पेटवले

छत्रपती उदयनराजे व छत्रपती संभाजीराजे यांनी धनगर आरक्षणासाठीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन राम शिंदे यांनी कालच कोल्हापूर येथे केले होते. त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याशी चर्चाही केली होती. आता उदयनराजे यांच्यासोबत ते चर्चा करणार आहेत.

राम शिंदे व छत्रपती उदयनराजे यांच्या या संभाव्य भेटीबाबत धनगर समाजामध्येही औत्सुक्य निर्माण झाले आहे.

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी