33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रअनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल!

अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल!

टीम लय भारी

मुंबई :- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांच्या प्रकरणात सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. (The CBI has registered a case against former Home Minister Anil Deshmukh).अनिल देशमुखांना नागपूर येथील घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे(The CBI has registered an FIR against Anil Deshmukh).

 

100 कोटींची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात सीबीआयने देशमुखांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यानंतर नागपूर तसेच मुंबईतील त्यांच्या घरांवर छापेमारी करण्यात आली. यावेळी नागपूरमधून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी अनिल देशमुख यांच्या सह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A case has been registered against five persons, including Anil Deshmukh).

हे 5 जण अनोळखी असल्याचे एफआयआर मध्ये नमुद करण्यात आले आहे. दरम्यान आरोपी या रकान्यात अनिल देशमुखांचेही नाव आहे (Meanwhile, Anil Deshmukh is also named in the accused column). महाराष्ट्राच्या राजकारणातील ही अत्यंत मोठी घडामोड आहे. राज्याच्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे (The CBI has registered an FIR against former state Home Minister Anil Deshmukh).

संतापजनक : 700 बेडचे ‘कोरोना’ रूग्णालय दोन दिवसांत उभे राहणार होते, पण निलम गोऱ्हेंच्या आडमुठेपणामुळे ते रद्द झाले

बीकेसी जम्बो कोविड रुग्णालयातील सावळागोंधळ आणि रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असणा-यांवर कारवाईची मागणी

CBI books former Maharashtra minister Anil Deshmukh, searches his home in Mumbai

प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले होते. त्यानंतर सीबीआयने ही कारवाई केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी सीबीआयने महाराष्ट्रचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी सीबीआयने मुंबई-नागपूरसह विविध भागात छापेमारी केल्यानंतर अनिल देशमुखांना ताब्यात घेण्यात आले आहे (Anil Deshmukh has been arrested after the CBI conducted raids in various parts of the country, including Mumbai and Nagpur).

परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये पोलिसांमार्फत वसुली करण्याचा गंभीर आरोप केला होता (Parambir Singh had leveled serious allegations against Anil Deshmukh for recovering Rs 100 crore from the police). या प्रकरणी परबीर सिंग यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. तसेच परमबीर सिंह यांच्यासह घनश्याम उपाध्याय, मोहन भिडे यांच्या जनहित याचिका तर डॉ. जयश्री पाटील यांची रिट याचिका या सर्व याचिका हायकोर्टाने निकाली काढल्या होत्या. याचिकाकर्त्या डॉ. जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील करतांना असे म्हटले होते की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी.

या खटल्याची सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, अनिल देशमुख हे गृहमंत्री असल्याने पोलीस या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करू शकणार नाहीत (As Anil Deshmukh is the Home Minister, the police will not be able to conduct an impartial inquiry into the matter). त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात येत आहे, त्यानंतर आज सीबीआयने अनिल देशमुखांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी