31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री म्हणाले; 'शाब्बास, दिल्लीत झेंडा फडकवलात' !

मुख्यमंत्री म्हणाले; ‘शाब्बास, दिल्लीत झेंडा फडकवलात’ !

टीम लय भारी

मुंबई:-  देशाच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बुधवारी दिल्लीच्या राजपथावर संचलन पार पडले. या संचलनात विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्ररथ सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नेहमीप्रमाणे सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला. महाराष्ट्रातील जैवविविधता या विषयावर यंदाच्या चित्ररथाचा देखावा आधारित होता.( Chief Minister said; ‘Well done, flag hoisted in Delhi)

महाराष्ट्राच्या चित्ररथावरील सजावट आणि कलाकुसर ही नेहमीच कौतुकाचा विषय ठरते. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसमोरुन महाराष्ट्राचा चित्ररथ जात असताना सर्वचजण स्तब्ध होऊन पाहत होते. त्यामुळे महाराष्ट्राचा चित्ररथ आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरला. यामध्ये राष्ट्रीय छात्रसेनेच्या महाराष्ट्र संचालनालयाने देशातील सर्वोत्कृष्ट संचालनालयाचे पारितोषिक पटकावले आहे.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरे यांनी जगविख्यात अजिंठा लेण्यांना दिली भेट, पर्यटनवाढीसाठी महत्वाचे पाऊल

मुख्यमंत्री शिवसेनेचा म्हणून मूळव्याध सतत सतवतो आहे का? महापौरांचा भाजपला टोला

७३ वा प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत राष्ट्रध्वज फडकवला

Maharashtra CM Uddhav Thackeray launches 91 Nirbhaya Squads to protect women

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय छात्रसेनेच्या महाराष्ट्र संचालनालयाने देशातील सर्वोत्कृष्ट संचालनालयाचे पारितोषिक पटकावल्याबद्दल  महाराष्ट्र संचालनालयाचे अभिनंदन केले आहे.

‘महाराष्ट्राच्या जिद्द आणि चिकाटीचा झेंडा दिल्लीत फडकवलात..छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याचा वारसा सांगणारी कामगिरी बजावलीत…शाब्बास..भले बहाद्दर…’ अशी शाबासकी देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिन संचलनात सर्वोत्कृष्टतेचा पंतप्रधान ध्वज (प्राईम मिनीस्टर्स बँनर) पटकावणाऱ्या महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या चमुचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत महाराष्ट्र छात्रसेनेच्या चमुला हा ध्वज प्रदान करण्यात आला. तसेच महाराष्ट्र संचालनालय आणि कॅडेट ऑफिसर पृथ्वी पाटील यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र एनसीसीची कॅडेट ऑफिसर पृथ्वी पाटील ही देशातील सर्वोत्तम छात्रसैनिक ठरली आहे. या यशासाठी पृथ्वी हिचे ही मुख्यमंत्र्यांनी कौतुक करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान ध्वज (प्राईम मिनीस्टर बँनर)चा वाहक सिनिअर अंडर ऑफिसर सिद्धेश जाधव, सर्वोत्कृष्ट संचालनालयासाठीचा पारितोषिक स्वीकारण्याचा मान मिळालेले महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी, कॅप्टन निकिता खोत यांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी