महाराष्ट्र

Chitra Wagh : महिलांच्या सुरक्षेचे पेटंट घेतलेल्या चित्रा वाघ भंडारा बलात्कार प्रकरणी चिडीचूप

राज्यात महिलेवर अन्याय झाला की, चित्रा वाघ ‘टायगर’च्या आवेशात नेहमी महाविकास आघाडी सरकारवर तुटून पडायच्या. त्यावेळी मंत्री संजय राठोड यांचा तर त्यांनी राजकीय बळीच घेऊन टाकला होता, परंतु जेव्हापासून राज्यात शिंदे फडणवीस सरकर स्थापन झाले आहे तेव्हापासून त्यांचा सूरच बदलला आहे. दरम्यान भंडाऱ्यातील ताज्या बलात्कार घटनेने अख्खा महाराष्ट्र हादरला असताना चित्रा वाघ यांनी मात्र शांत भूमिका स्विकारल्याचे दिसत आहे. तोंडदाखले साधे ट्विट करण्याचे सुद्धा त्यांनी आज सोपस्कार पार पाडले नसून थेट सरकारची बाजू ठामपणे मांडण्यासाठी चित्रा वाघ पीडितेची भेट घेण्यासाठी निघाल्या आहेत.

सामुहिक बलात्काराच्या घटनेने भंडारा जिल्हा चांगलाच चर्चेत आला आहे. या दुर्देवी घटनेला जबाबदार कोण म्हणून स्थानिक नागरिक प्रशासनाला जाब विचारत आहेत. दरम्यान भाजप आमदार नरेंद्र भोंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन पोलिस अधिक्षक वसंत जाधव यांची तडकाफडकी बदली केली होती, त्यामुळे जिल्ह्यात पोलिस अधिक्षकपद रिक्त राहिले होते. शिंदे – फडणवीस सरकारच्या या कारनाम्यामुळे जिल्हातील  सुरक्षितता, कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडले असल्याचे चित्र होते आणि यावर उत्तर म्हणून क्रुरतेची सीमा पार करणारी सामुहिक बलात्काराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

हे सुद्धा वाचा

Bhandara Rape Case : एकनाथ शिंदेंनी पोलिसांना दुबळे केले, अन् महिलेवर झाला अघोरी बलात्कार

Nitesh Rane : दीपक केसरकरांच्या आरोपांना भाजप उत्तर देणार, थोड्याच वेळात पत्रकार परिषद

Aslam Shaikh : अस्लम शेख देवेंद्र फडणवीस यांना भेटले, त्यानंतरही त्यांच्या विरोधात सरकारी कारवाईला सुरूवात

या घटनेत 35 वर्षीय पीडित महिलेला मदत करण्याचे आमिष देत दोन वेगवेगळ्या प्रसंगी तीन जणांनी बलात्कार केला. यामध्ये पीडित महिलेवर बलात्कार करून तिला रस्त्यावरच सोडण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली महिला रात्रभर तशीच निवस्त्र रस्त्याच्या कडेला पडून राहिली, वेळेत मदत न मिळाल्याने पीडित महिलेची स्थिती आता गंभीर झाली आहे. प्रत्येक श्वासासाठी तिला झूंज द्यावी लागत आहे. या घटनेनंतर अवघा महाराष्ट्र हळहळला असून त्या पीडितेच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करीत आहेत.

दरम्यान, राज्यात दरवेळी कोणताही गुन्हा घडल्यानंतर पेटून उठणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यावेळी सुद्धा शांत भूमिकेत दिसून येत आहेत. माध्यामांमधून अन्यायाला न्याय मागणाऱ्या चित्रा वाघ शिंदे – फडणवीस सरकार आल्यापासून काहीशा मवाळ झाल्याचे दिसून येत आहे. गुन्ह कसाही असो त्यासाठी सरकारला कायम धारेवर धरणाऱ्या वाघ यांची भाषा सध्या बदलल्याचेच पाहायला मिळत आहे.

या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट पसरली असून या घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न विचारण्यात येत आहे. जसे देवाला प्रसन्न करण्यासाठी जसा बळी दिला जातो तसंच भंडारा जिल्ह्याला नवे पोलिस अधिक्षक मिळवून देण्यासाठी नियतीने एका महिलेला नराधमांच्या दाढेला दिले अशा दबक्या चर्चा सगळीकडे आता सुरू झाल्या आहेत. दरम्यान यावर नवं शिंदे – फडणवीस सरकार काय कारवाई करणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

3 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

5 hours ago

ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर’ भाजपच्या आरोपाने खळबळ

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपने एक…

6 hours ago

आरटीई अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण…

7 hours ago

नाशिक येथे एमएचटी-सीईटी (पीसीबी) ग्रुपची परीक्षा पार

एमएचटी-सीईटी परीक्षेतील भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) (MHT-CET (PCB)) ग्रुपची परीक्षा (exam) पार पडली आहे.…

7 hours ago

गंगापूर धरणात दूषित पाणी; नाशिककरांच्या आरोग्यास धोका

गंगापूर धरण (Gangapur dam) हे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण आहे. या धरणाद्वारेच होणारा…

7 hours ago