31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांचे भाकीत : नीतेश राणेंना 65 टक्के मते मिळतील, स्वाभिमान पक्ष अखेर...

मुख्यमंत्र्यांचे भाकीत : नीतेश राणेंना 65 टक्के मते मिळतील, स्वाभिमान पक्ष अखेर भाजपमध्ये विलीन

लय भारी न्यूज नेटवर्क

कणकवली : मी आजच सांगून ठेवतो. माझे भाकित लिहून घ्या. 60 ते 65 टक्के मते नीतेश राणे यांना मिळतील. त्यांचा विजय निश्चित आहे. बाकीचे उमेदवार उरलेल्या मतांत असतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नीतेश राणे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे, अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, निवडणुकीत अनेक लोक चितावणी देण्याचा प्रयत्न करतील. उचकवतील. परंतु जिंकणाऱ्यांनी वाघासारखे, मोठ्या मनाने वागले पाहीजे. यावेळी त्यांनी नारायण राणे यांचे तोंड भरून कौतुक केले.

लोक सतत विचारायचे, नारायण राणे साहेब भाजपमध्ये कधी प्रवेश करणार. त्यावेळी मी त्यांना सांगायचो ते भाजपमध्येच आहेत. ते भाजपचेच खासदार आहेत. त्यानंतर नीतेश यांचा प्रवेश झाला. आज निलेश व संपूर्ण महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा प्रवेश भाजपमध्ये झाला. यापूर्वी आम्ही ठरवले होते की, मुंबईत प्रवेश करायचा. पण भाजपच्या कार्यकर्त्यांनी विनंती केली होती की, हा प्रवेश सोहळा सिंधुदुर्गमध्ये व्हावा. त्यामुळे हा कार्यक्रम आता सिंधुदुर्गमध्ये झाल्याचे ते म्हणाले.

मला राणे साहेबांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. ते आक्रमक विरोधी पक्षनेते होते. मी आमदार होतो. ते विरोधी पक्षनेते होते. आम्हाला ते सातत्याने प्रोत्साहन द्यायचे. वेगवेगळे, क्लिष्ठ विषय समजावून सांगायचे. फायनान्स हा विषय अनेकांना कळत नाही. अनेकजण 20 – 20 वर्ष विधानसभेत असूनही त्यांना फायनान्स कळत नव्हते. पण राणे साहेब त्यातील एक्स्पर्ट होते. त्यामुळे माझी आणि राणे साहेबांची नाळ जुळली. त्यांचे भरपूर प्रेम मला मिळाले. ते गोपीनाथराव मुंडेंना सांगायचे फडणवीसांना संधी द्या. राणे साहेबांच्या नेतृत्वाचा, कर्तृत्वाचा फायदा आम्हाला सरकार चालविताना होईल. नीतेश राणे कणकवलीचे उमेदवार आहेत. विधानसभेत गेली पाच वर्षे त्यांनी कोकणाचे व सिंधुदुर्गचे प्रश्न मांडले. कोकणाचे हिरिरिने प्रश्न ते मांडायचे. राणे साहेबांच्या शाळेत ते तयार झालेत. आता आमच्या शाळेत त्यांना आणले आहे. राणे साहेबांचा आक्रमक गुण त्यांच्याकडे आला आहे. पण संयमाचा गुण आमच्या शाळेत मिळेल असा आशावाद मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी