31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांचा एक हात धावला दुसऱ्या हाताच्या मदतीला

मुख्यमंत्र्यांचा एक हात धावला दुसऱ्या हाताच्या मदतीला

लय भारी न्यूज नेटवर्क

औसा : औसा विधानसभा मतदार संघात प्रस्थापितांनी अभिमन्यू पवार यांना चक्रव्यूहात अडकवण्याची जोरदार तयारी केली आहे. मात्र इतिहासाची पुनरावृत्ती होऊ न देण्यासाठी आप्तस्वकीय व विरोधकांचा चक्रव्यूह भेदून या आधुनिक अभिमन्यूला बाहेर काढण्यासाठी ओमप्रकाश शेटे हे मित्राच्या मदतीला धावून आले आहेत. शेटे यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला असून मोठी ताकद अभिमन्यू पवार यांच्या पाठीशी उभा केली आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर होताच मुख्यमंत्र्यांचे डावे आणि उजवे हात म्हणून ओळखले जाणारे अभिमन्यू पवार व ओमप्रकाश शेटे हे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार अशा बातम्या इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियातून प्रकाशित झाल्या होत्या. नेतृत्व आणि जनमानसांची भावना असून सुद्धा दोघांच्याही उमेदवारीला स्थानिक प्रस्थापित राजकारण्यांनी विरोध केला. या अंतर्गत शह-काटशहाच्या राजकारणात अभिमन्यू पवार महायुतीचे तिकीट मिळविण्यात यशस्वी झाले.

औसा विधानसभा मतदारसंघात थेट मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार हे निवडणूक लढवत असल्याने या मतदारसंघावर तमाम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. त्यातही पक्षातील अंतर्गत विरोधामुळे या लढतीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. हा मतदार संघ मागील दहा वर्षापासून काँग्रेसच्या ताब्यात असून यापूर्वी तब्बल दोन वेळा शिवसेनेचे दिनकरराव माने निवडून आलेले आहेत. भाजपाने प्रथमच तरुण, तडफदार व विकासाची दृष्टी असलेल्या नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून या मतदारसंघातील हजारो कुटुंबांना मदत मिळालेली आहे. त्याचा पवार यांना निश्चितच फायदा होईल. अभिमन्यू तर निश्चितच विजयी होतील पण त्यांना विक्रमी मताधिक्‍याने विजयी करून त्यांचा विजय ऐतिहासिक बनविण्यासाठी प्रयत्न करत आहे.

-ओमप्रकाश शेटे

मुख्यमंत्री कार्यालयातील आपले सहकारी व जिवलग मित्र अभिमन्यू पवार यांच्या प्रचारासाठी  ओमप्रकाश शेटे यांनी औसा मतदार संघ अक्षरशः पिंजून काढला आहे. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या गाठीभेटी घेत सभा, बैठका यांच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा मजबूत केली आहे. नाराज कार्यकर्त्यांशी चर्चा करत त्यांचे मन परीवर्तन करून शेटे यांनी अभिमन्यू पवार यांची बाजू आणखी भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे.

[box type=”info” align=”aligncenter” class=”” width=””]नो पेड न्यूज’ : राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आपल्या हिताच्या बातम्या छापून याव्यात म्हणून अनेक उमेदवार प्रसारमाध्यमांना लालूच दाखवतात. त्या पार्श्वभूमीवर ‘लय भारी’ या न्यूज पोर्टलने ‘नो पेड न्यूज’ ही सुस्पष्ट भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे ‘लय भारी’ पोर्टलसाठी कुणीही लालूच दाखविण्याचा प्रयत्न करू नये. वस्तुनिष्ठ, सत्य व भारतीय राज्य घटनेच्या तत्वांना अनुसरूनच आम्ही पत्रकारिता करतो, हे अभिमानाने नमूद करीत आहोत. – संपादक[/box]

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी