30 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeमुंबईप्रचार शिगेला : नरेंद्र मोदी, राहूल गांधी यांच्यासह मातब्बर नेते प्रचाराच्या मैदानात

प्रचार शिगेला : नरेंद्र मोदी, राहूल गांधी यांच्यासह मातब्बर नेते प्रचाराच्या मैदानात

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रचार कालावधीमधील आज शेवटचा रविवार आहे. प्रचारसाठीही जेमतेम सहा दिवस उरले आहेत. निवडणुका दहा दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख नेते दंड थोपटून प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. मातब्बर नेत्यांच्या प्रचाराचा जोरदार धुरळा आज राज्यभरात उडणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव येथील कुसुंबा खुर्द येथे दुपारी 12 वाजता पहिली सभा, तर साकोली (जि. भंडारा) येथे दुपारी 3 वाजता दुसरी प्रचारसभा घेणार आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी औसा (लातूर) व धारावी (मुंबई) येथे सभा घेणार आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सकाळी 11.15 वाजता कोल्हापूरला, दुपारी 1.15 वाजता कराडला, दुपारी 3.30 वाजता शिरूरला, तर सायंकाळी 6 वाजता औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर (गंगापूर) येथे सभा घेणार आहेत. एकूण चार सभा अमित शाह आज एकाच दिवसात घेणार आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे तब्बल सात सभा एकाच दिवसात घेणार आहेत. सकाळी 11 वाजता अमरावती जिल्ह्यातील जुने धामणगावमध्ये पहिली सभा होणार आहे. त्यानंतर वरोरा (चंद्रपूर) येथे 1.10 वाजता दुसरी सभा, नागभीड (चिमूर, चंद्रपूर) येथे दुपारी 3.00 वाजता तिसरी सभा, दुपारी 4.50 वाजता मांढळ (कुही, नागपूर) येथे चौथी सभा, सायंकाळी 6.15 वाजता चंद्रकिरण नगर (नागपूर) येथे पाचवी सभा, रात्री 7.30 वाजता सरजू टाऊन (नागपूर) येथे सहावी सभा आणि शेवटची सातवी सभा 8.30 वाजता वनदेवी नगर (नागपूर) येथे होणार आहे.

केंद्रीय मंत्री प्रताप सरंगी यांची मुंबईत कांदिवली येथे सकाळी 11.30 वाजता सभा होणार आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही सभा आज राज्यात ठिकठिकाणी होत आहेत. दुपारी 1 वाजता त्यांची पहिली सभा लोणावळ्यात होत आहे. दुसरी सभा दुपारी 2.40 वाजता नाशिक, तिसरी सभा सायंकाळी 4.45 वाजता औरंगाबाद, चौथी सभा रात्री 7 वाजता नागपूर पश्चिम, पाचवी सभा नागूपर दक्षिण येथे रात्री 8 वाजता होणार आहे.

केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांची सभा दुपारी 1.30 वाजता पेण (रायगड) होणार आहे. दुपारी 4 वाजता त्यांची दुसरी सभा पनवेल येथे, तर तिसरी सभा सायंकाळी 7 वाजता ऐरोली (नवी मुंबई) येथे होणार आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा आज पाच सभा घेणार आहेत. पहिली सभा सिल्लोड (जालना) सकाळी 10 वाजता होणार आहे. दुसरी सभा दुपारी 12 वाजता परभणी, तिसरी सभा 1 वाजता गंगाखेड, चौथी सभा दुपारी 3 वाजता लोहा, पाच सभा सायंकाळी 5 वाजता कळमनुरी येथे होणार आहे.

शरद पवार यांची पहिली सभा सकाळी 11 वाजता अकोले (नगर), दुपारी 2 वाजता घनसावंगी (जालना) येथे दुसरी सभा, शेंदुर्णी (जामनेर) येथे दुपारी 4 वाजता तिसरी सभा, तर सायंकाळी 5.30 वाजता चाळीसगाव येथे तिसरी सभा सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे.

राज ठाकरे यांच्या दोन सभा आज मुंबईत होणार आहेत. पहिली सभा सायंकाळी 6.30 वाजता दहिसर (पूर्व) येथे, तर दुसरी सभा मालाड (पूर्व) येथे रात्री 7.30 वाजता होणार आहे.

[box type=”shadow” align=”aligncenter” class=”” width=””]नो पेड न्यूज’ : राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आपल्या हिताच्या बातम्या छापून याव्यात म्हणून अनेक उमेदवार प्रसारमाध्यमांना लालूच दाखवतात. त्या पार्श्वभूमीवर ‘लय भारी’ या न्यूज पोर्टलने ‘नो पेड न्यूज’ ही सुस्पष्ट भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे ‘लय भारी’ पोर्टलसाठी कुणीही लालूच दाखविण्याचा प्रयत्न करू नये. वस्तुनिष्ठ, सत्य व भारतीय राज्य घटनेच्या तत्वांना अनुसरूनच आम्ही पत्रकारिता करतो, हे अभिमानाने नमूद करीत आहोत. – संपादक[/box]

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी