33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रसाताऱ्यातील ‘या’ तालुक्यात 500 ‘कोरोना’ रूग्ण, मृत्यूदर मात्र अत्यल्प

साताऱ्यातील ‘या’ तालुक्यात 500 ‘कोरोना’ रूग्ण, मृत्यूदर मात्र अत्यल्प

टीम लय भारी

सातारा : ‘कोरोना’चा संसर्ग ग्रामीण भागातही वेगाने वाढत आहे. साताऱ्यातील कराड तालुक्यात ५३४ ‘कोरोना’ रूग्ण आढळून आले आहेत ( Corona death rate is low in Karad ). पण तेथील मृत्यूदर मात्र फारच कमी आहे.

सातारा जिल्ह्यातील ‘कोरोना’ बाधितांची एकूण संख्या २५०० च्या वर गेली आहे ( Corona patient in satara district ) . त्यातीत मृतांची संख्या ८५ आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा मृत्यू दर पाहिला असता ३.३२ टक्के असल्याचे दिसून येते. मात्र यात सर्वाधिक जावळी तालुक्यातील १२ बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

साताऱ्यातील ‘या’ तालुक्यात 500 ‘कोरोना’ रूग्ण, मृत्यूदर मात्र अत्यल्प
जाहिरात

जिल्ह्यात सार्वधिक ५३४ बाधीत संख्या असणाऱ्या कराड तालुक्याचा मृत्यू दर सर्वात कमी अवघा १.४९ टक्के आहे. त्याखालोखाल महाबळेश्र्वर तालुक्याचा १.५६ टक्के आहे.

राज्यात पुणे, मुंबई येथे कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. पुण्यालगतच्या सातारा जिल्ह्यातही कोरोना बाधीतांची संख्याही अडीच हजारावर पोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून चोवीस तासात शंभर व त्यापेक्षाही अधिक बाधीत सापडू लागल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे ( Corona outbreak in Satara ).

प्रवास तसेच बाधितांचा सहवास याशिवाय काही हिस्ट्री नसणारेही बाधीत सापडू लागल्याने समूह संसर्गाची भिती व्यक्त होत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

शहराबरोबरच ग्रामीण भागातील रूग्णांची संख्या वाढत आहे. सुरवातीपासूनच जिल्ह्याच्या कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांची संख्या समाधानकारक असल्याने ती एक समाधानाची बाब आहे.

जिल्ह्यात आजअखेर २५५४ बाधीत रूग्‍ण सापडले असून त्यातील ८५ जणांचा मृत्यू झाला आहे. एक हजार ३७० रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. मृतांमध्ये सर्वाधिक १२ जावळी तालुक्यातील असून त्यापाठोपाठ वाई व सातारा तालुक्यातील प्रत्येकी अकरा, खटाव तालुका दहा, पाटण व फलटण तालुक्यांतील प्रत्येकी नऊ, कराड ८, खंडाळा ५, माण ४ कोरेगाव तीन व महाबळेश्र्वर एक असे मृत बाधीत आहेत.

Advt
जाहिरात

जिल्ह्यात सर्वाधिक बाधीत कऱाड तालुक्यात सापडले असून ती संख्या ५३४ वर पोचली आहे. त्यापाठोपाठ सातारा तालुका ४१७, जावळी ३१९, वाई ३०६, पाटण १९९ , खंडाळा १९२, फलटण १९१, खटाव १३७, कोरेगाव १११, महाबळेश्र्वर ६४ तर माण तालुक्यात ८४ बाधीतांची संख्या आहे.

अशी आहे सातारा जिल्ह्याची स्थिती

( सातारा जिल्ह्यातील तालुकानिहाय ‘कोरोना’ बाधितांची संख्या, कंसात बाधीत व मृत्यू दर )

जावली तालुका – 319 (12) 3.78 %

कराड – 534  (8) 1.49%

खंडाळा – 192 (7) 3.64%

खटाव -137 (10) 7.29%

कोरेगाव -111 (3) 2.70%

महाबळेश्वर – 64 (1) 1.56 %

माण – 84 (4)  4.76%

पाटण – 199 (9)  4.52%

फलटण -191(9)  4.71%

सातारा -417 (11) 2.63 %

वाई -306 (11) 3.59%

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी