31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रकोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या थैमानामुळे सत्या नाडेला, सुंदर पिचाई हळहळले; मायक्रोसॉफ्ट-गुगल मदतीसाठी पुढे...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या थैमानामुळे सत्या नाडेला, सुंदर पिचाई हळहळले; मायक्रोसॉफ्ट-गुगल मदतीसाठी पुढे सरसावले

टीम लय भारी

मुंबई :- कोरोनाच्या प्रादुर्भाव झापाट्याने वाढत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या थैमानामुळे (Due to the second wave of corona) झालेल्या विध्वंसानंतर (Coronavirus in India) आता अनेक देश भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवरुन भारताकडे मदतीचा ओघ सुरु झाला असतानाच आता मायक्रोसॉफ्ट आणि गुगल (Microsoft and Google) जगातील दोन बलाढ्या कंपन्याही भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहे. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ (CEO) सत्या नाडेला आणि गुगलचे सीईओ (CEO)  सुंदर पिचाई यांनी ट्विट करु तशी माहिती दिली (Google CEO Sundar Pichai and Microsoft CEO Satya Nadella announce to help India in battle agains Coronavirus).

भारतामधील सध्याची परिस्थिती पाहून माझे हदय विदीर्ण झाले आहे. अमेरिकेने भारताला मदत करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी आभारी आहे. कोरोनावरील उपचारांसाठी लागणारी आर्थिक मदत, वैद्यकीय उपकरणे आणि ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्सच्या खरेदासाठी मायक्रोसॉफ्ट आवाज उठवत राहील (Microsoft will continue to raise its voice), असे सत्या नाडेल यांनी सांगितले.

रेमडिसीवर वादावर सुजय विखे-पाटलांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

निलम गोऱ्हे यांच्यावर ‘महाविकास आघाडी’चे नेते नाराज

तर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारताला वैद्यकीय मदत करण्यासाठी गुगलकडून 135 कोटींचा निधी पुरवाल जाईल (Google will provide Rs 135 crore), अशी घोषणा केली. गिव्ह इंडिया, युनिसेफ, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ही मदत पुरविली जाईल, असे सुंदर पिचाई यांनी स्पष्ट केले.

‘मोदी सरकार कोरोना रोखायचा सोडून हेडलाईन मॅनेजमेंट करत बसलेय’

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहा:कार उडाल्यानंतर आता केंद्र सरकारला लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर (Parkala Prabhakar) यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे. मोदी सरकार हे कोरोना रोखण्याऐवजी उपाययोजना करायचे सोडून हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त असल्याची टीका त्यांनी केली आहे.

Coronavirus: India likely to get first batch of Russia’s Sputnik V vaccine by May-end

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना मृतांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. ही आपातकालीन परिस्थिती आहे. केंद्र सरकारने अशा परिस्थितीत लोकांची मदत करायला हवी. मात्र, केंद्र सरकार हेडलाईन मॅनेजमेंट आणि स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात व्यस्त असल्याचे त्यांनी म्हटले.

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी