33 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रलस संपण्याच्या भीतीने मुंबईकरांची कोव्हिड सेंटरवर गर्दी

लस संपण्याच्या भीतीने मुंबईकरांची कोव्हिड सेंटरवर गर्दी

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे मुंबईत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्राला तातडीने कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा करण्याच्या मागणीला केंद्र सरकारने केराची टोपली दाखवल्यानंतर आता मुंबईकरांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.  कोरोना लसींचा (Covid vaccine) साठा संपत आल्यामुळे मुंबईतील अनेक लसीकरण केंद्र बंद पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये घबराट पसरली आहे.

याच भीतीपोटी शुक्रवारी मुलुंडच्या जम्बो कोव्हिड सेंटरवर नागरिकांनी लस घेण्यासाठी तोबा गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे याठिकाणी प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. लसीचा साठा संपल्यास आपल्याला लस मिळणार नाही, या भीतीने नागरिकांनी या केंद्रावर धाव घेतल्याचे सांगितले जाते. परंतु, याठिकाणी असणारे कोरोना लसीचे डोस संपत असल्याने मोजक्याच नागरिकांना आतमध्ये घेण्यात आले आहे. परिणामी इतर नागरिकांची गैरसोय झाली आहे.

मुलूंडच्या कोव्हिड सेंटरवर सध्या सोमवारपर्यंत कोणतेही लसीकरण होणार नाही, अशी उद्घोषणा केली जात आहे. त्यामुळे हताश होऊन घरी पतरण्याशिवाय नागरिकांकडे कोणताही पर्याय उरलेला नाही.

बीकेसीसह मुंबईतील २६ लसीकरण केंद्र बंद

मुंबईसह राज्यात कोरोनाच संसर्ग वाढलेला असतानाच कोरोना लसीचा तुटवडाही भासत आहे. मुंबईतील ७२ पैकी २६ खासगी व्हॅक्सीनसेंटरमधील लस संपल्याने या २६ ठिकाणचे लसीकरण बंद करण्यात आले आहे. मुंबईतील सर्वात मोठे लसीकरण केंद्र असलेल्या बीकेसी कोविड सेंटरमध्येही लस संपल्याने या ठिकाणचंही लसीकरण बंद करण्यात आले आहे.

राज्यात केवळ दोन दिवस पुरेल एवढ्याच लसी आहेत. मुंबईत लसीचा तुटवडा प्रचंड प्रमाणात निर्माण झाल्याने खासगी लसीकरण केंद्रांवरील लस देणे बंद करण्यात आले आहे. मुंबईत एकूण १२०  लसीकरण केंद्र आहेत. त्यापैकी ४९ लसीकरण केंद्रे शासकीय आहेत. या केंद्रावर रोज ४० हजार ते ५० हजार लस दिल्या जातात. बुधवारी राज्यात १४ लाख डोस होत्या. अनेक जिल्ह्यात आज किंवा उद्या कोरोना लसीचा साठा संपेल. केंद्राला याबाबतची माहिती लिखित स्वरुपात दिली असल्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी