30 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रDevendra Fadanvis : स्टार्टअपसाठी सरकार देणार भरीव आर्थिक साह्य; देवेंद्र फडणवीसांची माहिती

Devendra Fadanvis : स्टार्टअपसाठी सरकार देणार भरीव आर्थिक साह्य; देवेंद्र फडणवीसांची माहिती

महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप कॅपिटल आहे. देशात मागील वर्षभरात नव्याने सुरू झालेल्या ४२ युनिकॉर्नपैकी ११ युनिकॉर्न महाराष्ट्रातील आहेत. रजिस्टर्ड स्टार्टअप्समधील सर्वाधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रातील आहेत.

महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप कॅपिटल आहे. देशात मागील वर्षभरात नव्याने सुरू झालेल्या ४२ युनिकॉर्नपैकी ११ युनिकॉर्न महाराष्ट्रातील आहेत. रजिस्टर्ड स्टार्टअप्समधील सर्वाधिक स्टार्टअप्स महाराष्ट्रातील आहेत. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही २०१८ मध्ये राज्याचे स्वतंत्र स्टार्टअप धोरण आखले होते. यामुळे राज्यात स्टार्टअप्सच्या विकासासाठी इकोसिस्टीम तयार झाली. आपण देशाला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनविण्याचे ध्येय ठेवले आहे. यामध्ये इनोवेशन्सचे महत्त्वपूर्ण योगदान असणार आहे, स्टार्टअपविषयक कोणत्याही उपक्रम, योजनेसाठी राज्य शासनाकडून भरीव अर्थसहाय्य देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात आलेल्या स्टार्टअप सप्ताह आणि स्टार्टअप यात्रेतील विजेत्यांना आज राजभवन येथे राज्यपाल कोश्यारी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, स्वीडनच्या कौन्सुलेट जनरल ॲना लॅकवॉल, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी़ डॉ. रामास्वामी एन. आदी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

Supriya Sule : ‘भारतीय जनता पक्ष लाँड्री झालाय!’ सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका

Journalism Reality Check : मेनस्ट्रीम मीडियामध्ये दलितांना नगण्य स्थान!

Anil Gote : राष्ट्रवादीच्या अनिल गोटेंकडून देवेंद्र फडणविसांना ढेकणाची उपमा

फडणवीस म्हणाले की, देशामध्ये आता 5G तंत्रज्ञान लागू झाले आहे. हे तंत्रज्ञान आपण काळाच्या खूप आधी स्वीकारले आहे. भविष्यात 6G तंत्रज्ञान स्वीकारणारा आपला भारत देश हा जगातील पहिला देश ठरेल. इंटरनेटचे जाळे आता देशातील गावोगावी आणि दुर्गम भागातही पोहोचले आहे. 5G तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्य, शिक्षण, कृषी अशा विविध क्षेत्रातील नवनवीन संकल्पना दुर्गम भागापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवता येतील.

‘आयटीआयचे आधुनिकीकरण करणार’
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवकांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी कौशल्य विकासाची सुरुवात केली. राज्यामध्येही त्यानंतर स्वतंत्र कौशल्य विकास विभाग सुरु करण्यात आला. स्टार्टअप्स आणि युनिकॉर्न्सना चालना देण्यासाठी राज्यात विविध सवलती, योजना यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यात आयटीआयच्या अभ्यासक्रमामध्ये कालानुरुप बदल करण्यात येत असून त्यांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. आयटीआयमध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना उद्योजकतेची जोड देणे, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे याअनुषंगाने बदल करण्यात येतील, असे श्री. लोढा यांनी सांगितले.

‘महाराष्ट्राला स्विडनचे संपूर्ण सहकार्य’
स्वीडनच्या कौन्सुलेट जनरल ॲना लॅकवॉल म्हणाल्या की, स्विडन हे इनोव्हेशन्समधील जगातील एक प्रमुख आघाडीवरील राष्ट्र आहे. महाराष्ट्रात स्टार्टअप आणि उद्योजकतेच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहेत. महाराष्ट्रामध्ये या क्षेत्राच्या विकासाला खूप मोठा वाव आहे. यासाठी महाराष्ट्राला स्विडनचे संपूर्ण सहकार्य राहील, असे त्यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी