35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रJournalism Reality Check : मेनस्ट्रीम मीडियामध्ये दलितांना नगण्य स्थान!

Journalism Reality Check : मेनस्ट्रीम मीडियामध्ये दलितांना नगण्य स्थान!

देशाच्या लोकशाहीचा चौथा खांब म्हणून माध्यमांना स्थान दिले जाते. मात्र मुख्यधारेतील (मेनस्ट्रीम) माध्यमांमध्ये उच्च पदांवर अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील प्रतिनिधित्व अत्यंत नगण्य असल्याचे दिसून येते.

देशाच्या लोकशाहीचा चौथा खांब म्हणून माध्यमांना स्थान दिले जाते. मात्र मुख्यधारेतील (मेनस्ट्रीम) माध्यमांमध्ये उच्च पदांवर अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील प्रतिनिधित्व अत्यंत नगण्य असल्याचे दिसून येते. डिजिटल मीडियाच्या केवळ दोन आस्थापनांमध्ये या समजातील प्रतिनिधित्व उच्चपदावर असल्याचे दिसून आले. न्यूज लॉँन्ड्री आणि ऑक्सफैम इंडियाच्या ताज्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. या अहवालात म्हटले आहे की, देशातील 60 टक्क्यांहून अधिक हिंदी आणि इंग्रजी भाषेतील वृत्तपत्रांमध्ये लिहिणारे लोक हे सर्वसाधारण वर्गातून येतात. एससी- एसटी वर्गातील केवळ 5 टक्के लोकच एससी-एसटी या वर्गातून येत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. अहवालासाठी एप्रिल 2021 ते मार्च 2022 या कालावधित ही माहिती देशातील सात वृत्तपत्रे, 12 साप्ताहिके आणि 9 डिजिटल मीडिया आस्थापनांचा डाटा एकत्रित केला गेला.

ऑक्सफैम इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ बेहर म्हणाले, आजच्या काळात सामाजिक न्यायाची अधिक गरज आहे. त्यामुळे माध्यमांमध्ये विविध जातींच्या प्रतिनिधीत्वाबाबत अहवाल प्रकाशीत करणे आवश्यक आहे, कारण लोकांना याबाबत माहिती मिळणे गरजेचे आहे. स्क्रोलच्या कार्यकारी संपादक सुप्रिया शर्मा म्हणाल्या, माध्यमांमध्ये सवर्ण जातींचा दबदबा आहे. त्यामुळे ते लोक ही व्यवस्था आहे तशी ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र माध्यमांमध्ये आता दलितांची संख्या वाढत आहे, असे असले तरी ही संख्या अद्याप अत्यंत नगण्य आहे. न्यूजलॉंन्ड्रीचे कार्यकारी संपादक अतूल चौरसिया म्हणाले, हिंदी असो वा इंग्रजी मुख्यधारेतील माध्यमांमध्ये सर्वच पदांवर दलितांचे स्थान नगण्य आहे. आपल्या समाजातील जाती व्यवस्थेचा प्रभाव माध्यमांमध्ये देखील दिसून येतो. ऑनलाईन माध्यमांमुळे दलितांना माध्यमांमध्ये संधी मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

Anil Gote : राष्ट्रवादीच्या अनिल गोटेंकडून देवेंद्र फडणविसांना ढेकणाची उपमा

TV Actress Vaishali Thakkar Suicide : घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीची आत्महत्या! इंस्टाग्राममार्फत 5 दिवसांपूर्वीच दिले होते संकेत

Eknath shinde : एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील ‘मोस्ट हेट नेम!’; सामनातून मुख्यमंत्र्यांवर डागली तोफ

या अहवालानुसार न्यूज टिव्ही चॅनल माध्यमांत 56 टक्के इंग्रजी चॅनलचे अँकर आणि 67 टक्के हिंदी चॅनलचे अँकर हे सवर्ण जातीचे आहेत. टीव्ही डिबेट करणाऱ्या अँकरपैकी एकही अँकर एससी, एससी वर्गातील नाही. तर डिजिटल मीडियामध्ये 55 टक्के डिबेट करणारे अँकर आहेत, तर 5 टक्क्यांहून कमी लेखक एससी-एससी वर्गातून येतात. अहवालात म्हटले आहे की, इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये दलित, वंचित, आदिवासींच्या समस्यांबाबत डिबेटची संख्या अत्यंत कमी आहे. हिंदी न्यूज चॅनलमध्ये केवळ 1.6 टक्के प्राईम टाईम डिबेट एससी-एसटीवर्गाबाबत चर्चा केलेली दिसून आली.

प्राईम टाईमध्ये दलितांच्या प्रश्नांवर डिबेट (टक्केवारीमध्ये)
एनडीटीव्ही : 3.6
एबीपी न्यूज़ : 2.4
आजतक : 1..8
संसद टीवी : 1.3
झी न्यूज़ : 1.3
इंडिया टीवी : 0.8
सीएनएन न्यूज़ १८ आणि रिपब्लिक भारत : एकही डिबेट नाही.

न्यूजरूममधील पदे
सवर्णांकडे : 106
अन्य मागास घटकांकडे : 6
अल्पसंख्याक घटकांकडे : 6

न्यूज टीव्ही चॅनल्समध्ये दलित, सवर्णांना स्थान
40 हिंदी चॅनल आणि 47 इंग्रजी चॅनल्समधील आकडेवारी
अँकर सवर्ण : 3 (4 पैकी)
दलित, आदिवासी, ओबीसी : 0
डिबेटमध्ये सवर्णांचे प्रमाण : 70 %
5 टक्क्यांपेक्षा कमी – इंग्रजी वृत्तपत्रांतील दलित, आदिवासी लेखकांच्या लेखांचे प्रमाण
10 टक्के – हिंदी वृत्तपत्रांतील प्रमाण

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी