28 C
Mumbai
Friday, May 3, 2024
HomeराजकीयAnil Gote : राष्ट्रवादीच्या अनिल गोटेंकडून देवेंद्र फडणविसांना ढेकणाची उपमा

Anil Gote : राष्ट्रवादीच्या अनिल गोटेंकडून देवेंद्र फडणविसांना ढेकणाची उपमा

अनिल गोटे यांनी एक ट्विट शेअर करत अलंकारिक भाषेत देवेंद्र फडणवीस यांना थेट ढेकणाची उपमा दिली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या तीन नावांची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. प्रत्येक पक्षातील नेते एकमेकांच्या विरोधात ठाकलेल्या नेत्यांवर आरोप करत आहेत. त्यामुळे सध्याच्या राजकारणात केवळ आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशांतच राष्ट्रवादी काँग्रेसचे माहाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी एकत्रितपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. अनिल गोटे यांनी एक ट्विट शेअर करत अलंकारिक भाषेत देवेंद्र फडणवीस यांना थेट ढेकणाची उपमा दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांनी एक ट्वीट शेअर केले आहे. ज्यात त्यांनी म्हंटले आहे की, “ढेकणा संगे हिरा जो भंगला; एकनाथ शिंदे खरे तर दिलदार व्यक्ती पण सत्तेच्या लालसे पोटी असंगाशी संग करुन बसले. मी एकनाथ शिंदेंना लिहिलेल्या पत्रात भाजपाच्या कपटी धोकेबाज लबाडी बद्दल खुले पणाने कल्पना दिली होती. आता त्यांना माझा एक एक शब्द आठवत असेल! लटके मॅडम पालीके” अशा टोचक शब्दांत अनिल गोटे यांनी थेट एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेवत देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे.

हे सुद्धा वाचा

TV Actress Vaishali Thakkar Suicide : घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीची आत्महत्या! इंस्टाग्राममार्फत 5 दिवसांपूर्वीच दिले होते संकेत

Raj Thackeray : ‘भाजपने अंधेरी पोटनिवडणूक लढवू नये’; राज ठाकरेंची पत्र लिहून फडणवीसांना विनंती

Prithviraj Sukumaran : सालारमधील सुपरस्टार पृथ्वीराजचा ​​फर्स्ट लुक आऊट! पाहा सुपर सिनेमाचा सुपर पोस्टर

तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस आणि कांग्रेस या तीन पक्षांची मिळून उभी राहिलेल्या महाविकास आघाडीचे सरकार होते. मात्र, तीन महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेून शिवसेनेत बंड उभा केला. त्यानंतर महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अपुऱ्या बहुमतामुळे राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित येत राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतरच एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी निशाणा साधयला सुरुवात केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र्रात झालेल्या सत्तांतरानंतर पहिल्यांदात अंधेरी पूर्व पोटनिवडणूच्या माध्यमातून दोन्ही गटांना आपली ताकद अनुभवण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळेच आता या निवणूकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अशांतच दिवंगत आमदार रमेश लटके यांची पत्नी बिनविरोध निवडून यावी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना उमेदवार मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आता या निवडणूकीची दिशा कुठे जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी