35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रजालना लाठीचार्ज प्रकरणी फडणवीसांनी मागितली मराठ्यांची माफी!

जालना लाठीचार्ज प्रकरणी फडणवीसांनी मागितली मराठ्यांची माफी!

जालना येथील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे पडसाद उमटत आहे. ह्या लाठीचार्ज प्रकरणी राज्यातील विविध राजकीय नेत्यांनी राज्य सरकार आणि गृह मंत्रालयाला जबाबदार धरले आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या आदेशावरूनच आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आलाी अशी टीका केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी राज्य सरकारच्या वतीने माफी मागितली आहे. तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत एक संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना देवेंद्र फडवणीस म्हणाले, “मराठा अरक्षणाबाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. मराठा आरक्षणासायंदर्भातील प्रश्नांबाबत तसेच जालना येथील आंदोलयांकर्त्यांच्या मंगण्यांबाबत या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. जालन्यातील आंदोलनात एक दुर्दैवी घटना घडली असून आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. ही एक दुर्दैवी घटना असून याचे समर्थन केले जाऊ शकत नाही.”

“मी याआधीही पाच वर्षे मुख्यमंत्री होतो. त्यावेळीसुद्धा आरक्षणासंदर्भात जवळपास दोन हजार आंदोलने झाली परंतु कधीही आमच्याकडून बळाचा वापर करण्यात आला नाही .आताही बळाचा वापर करण्याची गरज नव्हती. त्यामुळे बळाच्या वापरामुळे निष्पाप नागरिकांना इजा झाली आहे त्यांची शासनाच्या वतीने क्षमायाचना मागतो, ” फडणवीस माफी मागत म्हणाले.

याप्रकरणी, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे फडणविसांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधत फडणवीस म्हणाले, “काही नेत्यांनी या गोष्टीचे राजकारण केले हे दुर्दैवी आहे. विशेषतः लाठीचार्ज करण्याचे आदेश मंत्रालयातून आले हे नरेटीव करण्यात आले. लाठीमार करण्याचे आदेश देण्याचा अधिकार एसपी आणि डी वाय एस पी यांना असतात. ज्यावेळी 113 गोवारी पोलिसांच्या हातातुन मारले गेले त्यावेळी आदेश मंत्रालयातून आले होते का?”

हे ही वाचा 

मराठा आरक्षण: आता मराठा -ओबीसी वाद पेटण्याची चिन्ह

मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही; राज ठाकरे असे का म्हणाले…

देशाचे लक्ष मराठा आंदोलनाकडे वळवणारे मनोज जरांगे पाटील कोण आहेत?

फडणवीस यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही टीका केली. “मावळमध्ये जेव्हा शेतकरी मृत्युमुखी पडले तेव्हा आदेश पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले होते का? तेव्हा त्यांनी राजीनामा का दिला नाही?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी