31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराष्ट्रीयतामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा शिरच्छेद करणारास 10 कोटींचे बक्षिस; संत परमहंस आचार्यांची घोषणा

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा शिरच्छेद करणारास 10 कोटींचे बक्षिस; संत परमहंस आचार्यांची घोषणा

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे पुत्र अभिनेता आणि तामिळनीडू सरकामध्ये मंत्री असणारे उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटत आहे. अयोध्येचे संत परमहंस आचार्य यांनी उदयनिधी स्टॅलिन यांचा शिरच्छेद करणाऱ्यास १० कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर असून, त्यांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्या फोटो तलावरीने कापत त्यांचा प्रतीकात्मक शिरच्छेदही केला.

संत परमहंस आचार्य म्हणाले की, सनातन धर्माचे मूळ लाखो वर्षांपूर्वीपासून आहे. लाखो वर्षांपासून सनातन धर्म अस्तित्वात आहे. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीपासून काही धर्म अस्तित्वात आले आहेत. पृथ्वीवर एकच धर्म होता आणि तो धर्म म्हणजे सनातन धर्म. आचार्य म्हणाले की, सनातन धर्माला सुरुवात किंवा अंत नाही. सनातन धर्म कधीही नष्ट झाला नाही आणि कधीही नष्ट होऊ शकत नाही. जो कोणी सनातन धर्माचा ऱ्हास करण्याचा प्रयत्न करेल त्याचा नाश केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केल्याने वाद पेटला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर भाजपसह इतर पक्षांच्या नेत्यांनी देखील टीका केली आहे. त्यानंतर टीकेला प्रत्युत्तर देताना उदयनिधी म्हणाले की, मी फक्त सनातन धर्मावर टीका करत होतो आणि यापुढेही करणार आहे. या प्रकरणी आपल्यावर जे काही गुन्हे दाखल असतील त्याला सामोरे जाण्यास आपण तयार असल्याचेही उद्यानिधी स्टॅलिन यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा 
ट्रेनी एअर होस्टेसची गळा चिरून हत्या; आरोपीने सफाईच्या बहाण्याने केला फ्लॅटमध्ये प्रवेश
कार्तिक अन् साराचे पुन्हा सुर जुळले…
मराठा आरक्षण: आता मराठा -ओबीसी वाद पेटण्याची चिन्ह

उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यानंतर त्याविरोधात संत परमहंस आचार्य यांनी त्यांचा वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या फोटो तलवारीने कापत उदयनिधी यांचा शिरच्छेद करणाऱ्यांना १० कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. तामिळनाडूत डीएमके हा पक्ष हिंदूत्वविरोधी विचारधारेचा असून द्रविड विराचधारेचा पुस्कार करणारा हा पक्ष आहे. हिंदू धर्मातील सनातन विचारधारेला या पक्षाचा विरोध राहिलेला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी