31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रDevendra Fadnavis: गडचिरोली पोलिसांचे वेतन दोन दिवसांमध्ये वाढणार - पालकमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis: गडचिरोली पोलिसांचे वेतन दोन दिवसांमध्ये वाढणार – पालकमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या पगारात दीडपट वाढ करण्याचा निर्णय काही काळापासून प्रलंबित होता. परंतु, त्याबाबतचा निर्णय आता घेण्यात आला असून सोमवारपर्यंत पगारवाढीचा आदेश निघणार असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांनी सांगितले.

गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा आदेश दोन दिवसांत जारी केला जाईल असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपूर येथे जाहीर केले.  महाराष्ट्राचे गृहखाते सांभाळणारे आणि पूर्व महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले फडणवीस यांनी शुक्रवारी गडचिरोली शहरात जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली.

गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या पगारात दीडपट वाढ करण्याचा निर्णय काही काळापासून प्रलंबित होता. परंतु, त्याबाबतचा निर्णय आता घेण्यात आला असून सोमवारपर्यंत पगारवाढीचा आदेश निघणार असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा –

5G Services Launch: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5G सेवेचा दिल्लीत शुभारंभ

Tripling Season 3: द वायरल फीवर निर्मित ‘ट्रिपलिंग’चा तिसरा हंगाम लवकर येणार प्रेक्षकांच्या भेटीला

त्याशिवाय, गडचिरोलीमध्ये उभारल्या जाणाऱ्या कोनसारी स्पंज आयर्न प्रकल्पाचा पहिला टप्पा आणि त्यानंतरच्या 18,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या टप्प्यांना एप्रिल 2023 पर्यंत मंजुरी मिळेल अशी माहिती सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

खाण वाहतूक करणारी वाहने आणि ट्रकमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विशेष खाण कॉरिडॉर तयार केला जाईल. तसेच महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील मेड्डीगट्टा सिंचन प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नागरिकांना विशेष भरपाई पॅकेज दिले जाईल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी